आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

सक्रिय रुग्णांच्या संख्येतील घसरणीचा कल भारताने कायम राखला


27 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 20,000 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण

10 राज्यांमध्ये एकूण सक्रिय रुग्णांच्या 78 % रुग्णसंख्या

Posted On: 05 NOV 2020 1:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2020

सक्रिय रुग्णांच्या संख्येतील घसरणीचा कल भारताने कायम राखला आहे. आज सलग सातव्या  दिवशी, उपचाराधीन रुग्णांची संख्या सहा लाखांहून कमी नोंदली गेली असून 5,27,962 इतकी आहे. देशातील एकूण बाधित रूग्णांपैकी उपचार सुरू असलेल्या रुग्णांचे प्रमाण केवळ  6.31%  एवढेच आहे.

राष्ट्रीय कल कायम ठेवत 27 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता 20,000 पेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये देशातील एकूण सक्रिय रुग्णांच्या 78 % रुग्णसंख्या आहे. महाराष्ट्र, केरळ, दिल्ली आणि प. बंगालमध्ये एकूण सक्रिय रुग्णांपैकी 51% पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत.

दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कोविड बाधित रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 7,711,809 इतकी आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचार सुरु असलेले रुग्ण यातील अंतर सुमारे  72 लाख (71,83,847) इतके आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर वाढून 92.20% झाला आहे. गेल्या 24 तासात 55,331 कोविड रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर 50,210 नव्या रुग्णांची नोंद झाली.

बरे झालेल्या रुग्णांपैकी 82%  रुग्ण 10 राज्ये /केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकमध्ये एका दिवसात 8 हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांपैकी 45% हून अधिक रुग्ण या तीन राज्यांमध्ये आहेत.

गेल्या  24  तासात 50,210 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

नव्या रुग्णांपैकी 79% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

केरळ मध्ये काल एका दिवसात सर्वाधिक म्हणजेच 8,000 पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले, त्याखालोखाल  दिल्लीत  6000 पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24  तासात 704 मृत्यूंची नोंद झाली.

यापैकी  सुमारे 80% मृत्यू 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. नवीन मृत्यूंपैकी 42% हून अधिक एकट्या महाराष्ट्रातील (300 )आहेत.

 

U.Ujgare/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1670324) Visitor Counter : 242