PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
02 NOV 2020 8:12PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 02 नोव्हेंबर 2020


(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)




आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
जागतिक स्तरावर सर्वात जास्त रोगमुक्तांचा दर असणारा देश म्हणून भारताने आपले स्थान कायम राखले. रोगमुक्तांच्या संख्येने आज 75 लाखांचा आकडा (7,544,798) पार केला. संपूर्ण देशात गेल्या 24 तासांमध्ये 53,285 रुग्ण बरे झाल्याचे नोंदवले गेले.
आजारी (सक्रीय रुग्ण) रुग्णसंख्यासुद्धा कमी होत आहे. भारतातील सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 5,61,908 आहे.
गेल्या 24 तासात देशभरात बाधीत रुग्णसंख्या 45,321 एवढी नोंदवली गेली.
नवीन केसेसपैकी 80% केसेस 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात नोंदवल्या गेल्या आहेत. यापैकी 7,025 नवीन केसेस केरळमधील तर दिल्ली व महाराष्ट्र दोन्हीकडे 5000 पेक्षा जास्त केसेस दैनंदिन आढळून येत आहेत.
वैद्यकीय शिक्षणातील सुधारणांसाठी महत्वाचे पाऊल- राष्ट्रीय वैद्यकीय परीषदेने, वैद्यकीय शिक्षण परवडण्याजोगे व्हावे म्हणून परिषदेच्या नियमांमध्ये काही महत्वपूर्ण बदल जाहीर केलेत. या वर्षीच्या “एममीबीएस अभ्यासक्रमाच्या वार्षिक प्रवेशासाठी (2020) प्रवेश नियम,” असे शीर्षक आहे. या अधिनियमानुसार भारतीय वैद्यकीय परीषदेचे (MCI) पूर्वीचे नियम वैद्यकीय महाविद्यालयांसाठी किमान प्रवेश आवश्यकता मानदंड 1999 (for 50/100/150/200/250 वार्षिक प्रवेश) बदलण्यात आले आहेत.
इतर अपडेट्स
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी आज दिल्लीतील कोविड 19 परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीला डॉ.व्ही.के. पॉल, सदस्य, नीती आयोग, सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, महासंचालक, आयसीएमआर, मुख्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस आयुक्त, दिल्ली उपस्थित होते.
आयुष क्षेत्रात कोविड-19 विरोधातील जन आंदोलनाने मिळविला विजय-विभिन्न राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील संस्थांमध्ये वेगवेगळे आयुष घटक (आयुष केंद्र, रुग्णालये, शैक्षणिक संस्था) यांनी एकत्र येऊन जवळपास 5000 भीत्तीपत्रके आणि 8000 फलकांवर निवडक संदेश लावले. यामध्ये “मास्क घाला, हात धुवा आणि योग्य अंतर कायम ठेवा” या सारख्या मानक संदेशांचाही समावेश होता तसेच आयुष प्रतिकार शक्ती आणि संबंधित योगासनांबाबत उद्देशून देखील काही संदेशांचा समावेश होता.
ई-इनव्हॉईस - क्रांतीकारी सुविधेच्या आरंभाला 31 ऑक्टोबर रोजी एक महिना पूर्ण -व्यापारसंबधी आदानप्रदानात क्रांतीकारी बदल घडवण्यासाठी सुरू केलेल्या ई-इनव्हॉईस या महत्वपूर्ण सुविधेला 31 ऑक्टोबर रोजी एक महिना पूर्ण झाला. आरंभ झाल्यापासून महिन्याभरातच 27,400 करदात्यांनी एकूण 495 लाखांहून अधिक इनव्हाईस NIC पोर्टलवरून डाउनलोड करून घेतल्याची माहिती NIC ने दिली आहे.
आपत्कालीन पत हमी योजनेला सरकारकडून एक महिन्याची मुदतवाढ-केंद्र सरकारने ‘ईसीएलजीएस’ म्हणजेच आपत्कालीन पत हमी योजनेला दि.30 नोव्हेंबर, 2020 पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. या योजनेमध्ये आत्तापर्यंत दोन लाख कोटींपेक्षा जास्त वित्त पुरवठा करण्यासाठी कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. आता दि. 30 नोव्हेंबरपर्यंत किंवा तीन लाख कोटींपर्यंत कर्ज पुरवठा होईपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.
केंद्र सरकारकडून 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांना जीएसटी नुकसानभरपाईचा 6,000 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता विशेष कर्ज सुविधेअंतर्गत प्रदान- केंद्रीय अर्थमंत्रालय जीएसटी उपकरांची नुकसान भरपाई भरुन काढण्यासाठी राज्यांना विशेष सुविधेअंतर्गत 6000 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांना आज जारी करणार आहे. ही रक्कम भारित सरासरी उत्पन्नाच्या 4.42 टक्के आहे. ही रक्कम राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना याच दराने दिली जाणार आहे. जी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कर्ज घेण्याच्या दरापेक्षा कमी आहे, यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना फायदा होईल.
महाराष्ट्र अपडेट्स
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असलेल्या 244 ठिकाणी दररोज सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत 'वॉक-इन' तत्त्वावर मुंबईकरांना मोफत कोविड -19 चाचणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यापैकी काही ठिकाणी आरटी-पीसीआर चाचणी तर उर्वरीत ठिकाणी अँटीजेन आधारीत चाचणी केली जाणार आहे. बीएमसी महापालिका क्षेत्रात यापूर्वीच 54 खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा आहेत ज्या सुधारित शासकीय दराप्रमाणे कोविड-19 चाचणी सुविधा पुरवितात. रविवारी महाराष्ट्रात 6333 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1.25 लाख आहे. राज्यात आतापर्यंत 90.24 लाखाहून अधिक कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.








***
S.Tupe/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1669570)
Visitor Counter : 209