आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

रोगमुक्तांचा 75 लाखांचा आकडा ओलांडत जागतिक रोगमुक्तीमध्ये भारताचे अग्रस्थान कायम


गेल्या दोन महिन्यात सक्रीय रुग्णसंख्येची टक्केवारी तिपटीने घटली

भारतात एकूण रोगनिदान चाचण्यांनी 11 कोटींचा महत्वाचा टप्पा ओलांडला

Posted On: 02 NOV 2020 1:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2020

जागतिक स्तरावर सर्वात जास्त रोगमुक्तांचा दर असणारा देश म्हणून भारताने आपले स्थान कायम राखले. रोगमुक्तांच्या संख्येने आज 75 लाखांचा आकडा (7,544,798) पार केला. संपूर्ण देशात गेल्या 24 तासांमध्ये 53,285 रुग्ण बरे झाल्याचे नोंदवले गेले.

आजारी (सक्रीय रुग्ण) रुग्णसंख्यासुद्धा कमी होत आहे. भारतातील सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 5,61,908 आहे.

देशातील एकूण बाधित रूग्णांपैकी उपचार सुरू असलेले (Active) रुग्ण फक्त 6.83% एवढेच आहेत, दोन महिन्यांच्या कालावधीत, उपचार सुरू असलेल्यांच्या संख्येची टक्केवारी (सक्रीय रुग्ण) तीन पटीने घटली. 3 सप्टेंबरला ही टक्केवारी 21.16% होती.

जानेवारी 2020 पासून कोविड-19 चे रुग्ण भारतात सातत्याने गणिती श्रेणीने वाढत होते.  चाचण्यांच्या संख्येमधील वाढ ही आधीच्या टप्प्यावरील रोगनिदान आणि त्यानुसार उपचार यासाठी उपयुक्त ठरली. या संख्येने 11 कोटींचा (11,07,43,103) महत्वाचा टप्पा ओलांडला. राज्ये व केंद्राच्या संयुक्त प्रयत्नांनी  देशात रोगनिदान केंद्रांची संख्यावाढ होत आता 2037 रोगनिदान केंद्रे आहेत.

बरे होणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे राष्ट्रीय रोगमुक्तीचा दरसुद्धा सातत्याने वाढत आहे. तो सध्या 91.68% आहे.

गेल्या 24 तासात 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात 78% रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.  यापैकी 7,025 नवीन केसेस केरळमधील तर दिल्ली व महाराष्ट्र दोन्हीकडे 5000 पेक्षा जास्त केसेस दैनंदिन आढळून येत आहेत. केरळ व कर्नाटकात सर्वाधिक म्हणजे 8000 बरे झाले तर दिल्ली व पश्चिम बंगालमध्ये 4000 जण बरे झाले.

गेल्या चोविस तासात देशभरात  बाधीत रुग्णसंख्या 45,321 एवढी नोंदवली गेली.

नवीन केसेसपैकी  80% केसेस 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात नोंदवल्या गेल्या आहेत. यापैकी 7,025 नवीन केसेस केरळमधील तर दिल्ली व महाराष्ट्र दोन्हीकडे 5000 पेक्षा जास्त केसेस दैनंदिन आढळून येत आहेत.

गेल्या 24 तासात 496 मृत्यूंची नोंद झाली.

यापैकी 82%  मृत्यू 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात झाले.

काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 113 म्हणजे 22% महाराष्ट्रातील आहेत तर  पश्चिम बंगालमध्ये ही मृतांची संख्या 59 आहे.

 

U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1669432) Visitor Counter : 230