गृह मंत्रालय
केंद्रीय गृह सचिवांनी दिल्ली महानगरातील कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेतला
Posted On:
02 NOV 2020 6:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2020
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी आज दिल्लीतील कोविड 19 परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीला डॉ.व्ही.के. पॉल, सदस्य, नीती आयोग, सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, महासंचालक, आयसीएमआर, मुख्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस आयुक्त, दिल्ली उपस्थित होते.
सणासुदीच्या काळात लोकांची झालेली जास्त वर्दळ आणि सुरक्षित कोविड उचित वर्तनाचे पालन करण्यात आलेला हलगर्जीपणा यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत नुकतीच वाढ दिसून आली आहे.
रुग्णालयातील बेडची परिस्थिती समाधानकारक असून 15,789 पैकी 57 टक्के बेड रिक्त आहेत. तथापि, कोविडंसंदर्भात अंमलबजावणी व जनजागृती करण्यास कोणतीही कसर सोडली गेली नाही यावर जीएनसीटीडी अधिकारी आणि दिल्ली पोलिस आयुक्त यांनी यावर प्रकाश टाकला.
उत्सवाचा काळ आणि वाढत्या प्रदूषणासह कमी होत असलेले तापमान लक्षात घेऊन, दिल्लीत कोविड -19 च्या प्रसाराला आळा घालण्याच्या धोरणा संदर्भात आरोग्य मंत्रालयाचे प्रतिनिधी आणि बैठकीस उपस्थित आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा झाली.
रेस्टॉरंट्स, बाजाराची ठिकाणे, सलून इत्यादीसारख्या संवेदनशील आणि गंभीर विभागांमध्ये आरटी-पीसीआर चाचणीसारखे प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले आहे. तसेच बेड्स, आयसीयू आणि व्हेंटिलेटरसह वैद्यकीय सुविधांची उपलब्धता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी, उच्च स्तरावरील संपर्क ट्रेसिंग आणि अलग ठेवलेल्या संपर्कांचे निरीक्षण सुनिश्चित करणे हा सुद्धा यामधील प्रयत्नांचा भाग आहे.
आयईसी (माहिती, शिक्षण आणि संपर्क) मोहिमेद्वारे अधिक जागरूकता निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड रुग्णांच्या वैद्यकीय परिस्थितीत नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी, गृह अलगीकरणात असलेल्या सर्व रुग्णांवर देखरेख आणि योग्य वेळी रुग्णालयात हलविण्यात आल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक नियमावलीनुसार(एसओपी) काटेकोरपणे मेट्रो प्रवासाचे नियमन केले जावे यावरही यावर जोर देण्यात आला.
M.Chopade/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1669527)
Visitor Counter : 197