इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

ई-इनव्हॉईस - क्रांतीकारी सुविधेच्या आरंभाला 31 ऑक्टोबर रोजी एक महिना पूर्ण झाला


पहिल्या महिन्याभरातच 27,400 करदात्यांनी एकूण 495 लाखांहून अधिक इनव्हाईस NIC पोर्टलवर तयार केले

Posted On: 02 NOV 2020 2:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2020

व्यापारसंबधी आदानप्रदानात क्रांतीकारी बदल घडवण्यासाठी सुरू केलेल्या  ई-इनव्हॉईस या महत्वपूर्ण सुविधेला 31 ऑक्टोबर रोजी एक महिना पूर्ण झाला. आरंभ झाल्यापासून महिन्याभरातच 27,400 करदात्यांनी एकूण 495 लाखांहून अधिक इनव्हाईस NIC पोर्टलवरून डाउनलोड करून घेतल्याची माहिती NIC ने दिली आहे. आर्थिक वर्षात सरासरी 500 कोटी रुपयांहून जास्त उलाढाल असणाऱ्या उद्योगांसाठी 31 ऑक्टोबर 2020 ला आरंभ झालेली ई-इनव्हॉईस व्यवस्था ही GST व्यवस्थेतील अत्यंत महत्वाची व्यवस्था आहे.

भारताच्या व्यापार सुलभतेकडे (इझ ऑफ डुईंग बिझिनेस) चाललेल्या वाटचालीतील हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे.

1 ऑक्टोबर 2020 ला 8.4 लाख ई-इनव्हॉईससह सुरु झालेल्या या व्यवस्थेने हळूहळू वेग पकडला आणि 31 ऑक्टोबर 2020 ला यामधून एका दिवसभरात 35 लाख इनव्हॉईसेस तयार करण्यात आली. याला ऑक्टोबर 2020मध्ये तयार झालेल्या 641 लाख ई-वे बिलांचीही जोड असून त्यावरून व्यवस्थेची दृढमूलता लक्षात येते.  करदात्यांकडून मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून येते, की या सिस्टीमचा प्रतिसाद उत्तम असून कोणत्याही अडचणींविना IRN तयार होतात. NIC हेल्पडेस्ककडून साधल्या जाणाऱ्या सकारात्मक संवादामुळे करदात्यांना आपापल्या व्यवस्थेतील अडथळे दूर करून बिनचूकपणा साधण्याकडे मार्गक्रमणा करता आली.

15% करदात्यांनी IRN तयार करण्यासाठी ऑफलाईन व्यवस्थेचा वापर केला तर 85% करदात्यांनी API च्या माध्यमाचा लाभ घेतला.

 

U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1669442) Visitor Counter : 193