आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताने सलग 13 व्या दिवशी 10 लाखांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण संख्येचा कल कायम राखला


सलग तीन दिवस सुट्ट्या असूनही भारताने सलग तीन दिवस 10 लाखांपेक्षा अधिक नमुन्यांच्या चाचण्या केल्या

Posted On: 04 OCT 2020 2:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑक्‍टोबर 2020

 
भारताने सलग 13 दिवस  10 लाखांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण संख्येचा  कल कायम राखला आहे. 

आज सक्रिय रुग्णांची  संख्या 9,37,625 आहे. कालच्या तुलनेत ही संख्या 7371 ने  कमी आहे.

सलग तीन दिवस सुट्या असूनही भारताने गुरुवार -शुक्रवार-शनिवारी अनुक्रमे 10,97,947, 11,32,675 आणि 11,42,131 इतक्या मोठ्या संख्येने दररोज चाचण्या केल्या. 

भारताच्या दैनंदिन चाचणी क्षमतेत लक्षणीय  वाढ झाली आहे. दररोज 15 लाखाहून अधिक चाचण्या घेतल्या जाऊ शकतात.

गेल्या दहा दिवसांत दररोज सरासरी 11.5 लाख चाचण्या करण्यात आल्या.

जानेवारी 2020 मध्ये एकमेव  चाचणी  झाली होती, आता   एकूण चाचण्याची संख्या  7.89  कोटींच्या पुढे गेली आहे. सकारात्मकतेच्या  दरामध्ये मोठी  घट झाली आहे. सातत्याने  सकारात्मकतेचा  दर घसरत असल्यामुळे कोविड -19  संसर्गाचा प्रसार मर्यादित ठेवण्यासाठी चाचणी हे  अत्यंत प्रभावी साधन ठरत आहे. 

चाचण्यांच्या मोठ्या संख्येमुळे  लवकर निदान, त्वरित अलगीकरण आणि प्रभावी उपचार होत आहेत. यामुळे मृत्यूचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे.

दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून  देशात गेल्या  24 तासांत  82,260 इतके रुग्ण बरे झाले आहेत.  याउलट 75,829 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.  अलिकडच्या दिवसांत  बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा अधिक दिसून येत आहे.

भारताची बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 55 लाखाच्या (55,09,966) पुढे गेली आहे. एका दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याचे पडसाद राष्ट्रीय दरातही दिसून येत आहेत जो सध्या 84.13% आहे. 

कोरोनातून बरे झालेल्यापैकी 75.44%  दहा राज्ये/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत

सर्वाधिक सक्रिय रुग्ण असल्यामुळे बरे झालेल्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू ही राज्ये आहेत.

देशातील सक्रिय रुग्णांपैकी 77.11% रुग्ण 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत. आजपर्यंत, देशातील एकूण बाधित रुग्णांपैकी सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी होऊन केवळ 14.32%  झाले आहे.

नवीन रुग्णांपैकी  78% रुग्ण  दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशात केंद्रित आहेत. महाराष्ट्रात 14,000 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटक आणि केरळ या दोन्ही राज्यात अनुक्रमे 9886 आणि 7834 नवे रुग्ण आढळले आहेत. 

गेल्या 24 तासात 1000 पेक्षा कमी मृत्यू (940) नोंदले गेले आहेत.

यापैकी 80.53% मृत्यू 10 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात झाले आहेत.

काल नोंद झालेल्या मृत्यूपैकी 29.57% मृत्यू  म्हणजेच 278 मृत्यू  महाराष्ट्रात झाले असून  कर्नाटकमध्ये 100 मृत्यूंची नोंद झाली.  

मृतांच्या एकूण संख्येत महाराष्ट्राचे योगदान कमी होत आहे.

* * *

R.Tidke/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1661527) Visitor Counter : 121