PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
22 SEP 2020 7:40PM by PIB Mumbai
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
दिल्ली-मुंबई, 22 सप्टेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की पंच्याहत्तर वर्षांपूर्वी मानवी इतिहासामध्ये प्रथमच संपूर्ण जगासाठी एक संस्था तयार केली गेली आणि युद्धाच्या भीतीतून एक नवी आशा निर्माण झाली.
कोविड प्रतिसाद आणि व्यवस्थापनाची स्थिती व सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उद्या, 23 सप्टेंबर 2020 रोजी सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या सात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांसमवेत उच्चस्तरीय आभासी बैठक होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 सप्टेंबर 2020 रोजी फिट इंडिया चळवळीचा पहिला वर्धापन दिन साजरा करताना एका अनोख्या उपक्रमाअंतर्गत आयोजित देशव्यापी ऑनलाईन फिट इंडिया संवादादरम्यान तंदुरुस्तीबाबत उत्साही लोकांशी आणि नागरिकांशी संवाद साधतील. कोविड -19च्या काळात तंदुरुस्ती हा जीवनाचा सर्वात महत्त्वाचा घटक बनला आहे. या संवादामध्ये पोषण, निरोगीपणा आणि तंदुरुस्तीबाबत इतर पैलूंवर योग्य वेळी आणि फलदायी चर्चा दिसून येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या झालेल्या बैठकीत 2021-22 च्या विपणन हंगामासाठी अधिसूचित सर्व रब्बी पिकांसाठीच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याला मंजुरी देण्यात आली. स्वामिनाथन समितीच्या शिफारसींनुसार, किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) ही वाढ करण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
भारताने दिवसभरातील रोगमुक्तांची सर्वाधिक संख्या नोंदवली ही ऐतिहासिक घटना आहे.
देशभरातून एक लाखापेक्षा जास्त (1,01,468) रोगमुक्तांची संख्या गेल्या 24 तासात नोंदवली गेली.
एका दिवसातील रोगमुक्ताची संख्या आत्तापर्यंतची सर्वाधिक असणे ही बाब सलग गेले चार दिवस नोंदवली जात आहे हीसुद्धा एक मोठी जमेची बाजू आहे.
याशिवाय एकूण रोगमुक्तांची संख्या जवळपास 45 लाख (44,97,867) आहे . याबरोबरच रोगमुक्ती चा दर हा 80.86% वर पोहोचला आहे.
आजारातून मुक्त झालेल्यांपैकी 79% संख्या ही 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील असल्याचे नोंदवले गेले आहेत. ही दहा राज्ये म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, ओदिशा, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल आणि पंजाब.
यात 32,000 पेक्षा जास्त (31.5%,) संख्येसह महाराष्ट्राने आघाडी कायम राखली आहे. आंध्रप्रदेशने दिवसभरातील रोगमुक्तांची संख्या 10,000 पेक्षा जास्त नोंदवली आहे.
इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात सोमवारी 32,007 कोविड रुग्ण बरे झाले असून यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9,16,348 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर74.84 टक्के असून कोविड मृत्यू दर 2.7 टक्के आहे. राज्यात 2,74,623 सक्रिय रुग्ण आहेत. विहित प्रमाणात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावरील नियंत्रणासंदर्भात असलेले परिपत्रक सरकारने मागे घेतले आहे.
FACT CHECK
* * *
M.Iyengar/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1657884)
Visitor Counter : 291