आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताने दिवसभरातील सर्वाधिक रोगमुक्ताच्या संख्येचा विक्रम नोंदवला


गेल्या चोवीस तासात एक लाखापेक्षा जास्त रुग्ण रोगमुक्त झाले

Posted On: 22 SEP 2020 1:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2020


भारताने दिवसभरातील रोगमुक्तांची  सर्वाधिक संख्या नोंदवली ही ऐतिहासिक घटना आहे.

देशभरातून एक लाखापेक्षा जास्त (1,01,468) रोगमुक्तांची संख्या गेल्या 24 तासात नोंदवली गेली. 

एका दिवसातील रोगमुक्ताची संख्या आत्तापर्यंतची सर्वाधिक असणे ही बाब सलग गेले चार दिवस नोंदवली जात आहे हीसुद्धा एक मोठी जमेची बाजू आहे.

WhatsApp Image 2020-09-22 at 10.10.32 AM.jpeg

याशिवाय एकूण रोगमुक्तांची संख्या जवळपास 45 लाख (44,97,867) आहे . याबरोबरच रोगमुक्ती चा दर हा 80.86% वर पोहोचला आहे. 

आजारातून मुक्त झालेल्यांपैकी 79% संख्या ही 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील असल्याचे नोंदवले गेले आहेत. ही दहा राज्ये म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, ओदिशा, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल आणि पंजाब. 

यात 32,000 पेक्षा जास्त  (31.5%,) संख्येसह महाराष्ट्राने आघाडी कायम राखली आहे. आंध्रप्रदेशने दिवसभरातील रोगमुक्तांची संख्या 10,000 पेक्षा जास्त नोंदवली आहे. 

WhatsApp Image 2020-09-22 at 10.25.57 AM.jpeg

सर्वात जास्त रोगमुक्तांच्या संख्येसह  भारताने या आघाडीवर जगात सर्वात वरचे स्थान मिळवत महत्वाची कामगिरी नोंदवली आहे. 

सर्वात जास्त रोगमुक्ताच्या संख्येची सलग वाढती संख्या ही केंद्राने योजलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि चाचण्या, संसर्गाचा माग आणि उपचार या तीन टप्प्यात आखलेल्या धोरणाचा परिपाक आहे. 

केंद्राने वैद्यकीय व्यवस्थापन आणि उपचारांच्या नियमावलीत नवीन वैद्यकीय आणि शास्त्रीय माहितीनुसार वेळोवेळी  परिणामकारक सुधारणा केल्या.

भारताने रॅम्डेस्वीर, प्लाज्मा उपचार पद्धती तसेच टोकिलीझुम्ब आणि  प्रोनिंग, ऑक्सिजनचा थेट वापर, व्हेंटिलेटरचा योग्य तिथेच वापर आणि रक्तात गुठळ्या न होण्यासाठी दिली जाणारी औषधे अशा इतर पद्धती तसेच रोगनिदानावरील विविध उपचारपद्धतीचा विवेकी दृष्टीने वापर करण्यास दिलेली अनुमती यामुळे कोविड रोगमुक्ताची ही मोठी संख्या गाठता आली. याशिवाय सामान्य आणि मध्यम लक्षणांच्या रुग्णांना मार्गदर्शनाखाली गृह विलगीकरण किंवा अलगीकरणाची दिलेली सुविधा तसेच रुग्णांना तत्परतेने उपलब्ध करून दिलेली रुग्णवाहिका सेवा आणि वेळेवर मिळालेले उपचार यामुळे रुग्णांना परिणाम कारक आणि योग्य उपचार मिळणे शक्य झाले.  

एम्स, नवी दिल्ली या संस्थेने राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या उपचार पद्धतीत सुधारणा करण्यासाठी तसेच वैद्यकीय उपचारातील परिणामकारकता वाढवणे, ICU मधल्या डॉक्टरांच्या कौशल्यातील सुधारणा यासाठी covid-19 व्यवस्थापन ई-आयसीयू व्यवस्थापन या कार्यक्रमातून डॉक्टरांना  मार्गदर्शन केले. दर आठवड्याला मंगळवारी आणि शुक्रवारी भरणाऱ्या या कार्यक्रमामुळे देशभरात रोगमुक्तांच्या संख्येत वाढ आणि मृत्यूदर कमी राखण्यास  मदत झाली.

आतापर्यंत देशभरातून अशा 20  राष्ट्रीय ई-आयसीयू  आयोजित करण्यात आल्या.  त्याचा आजपर्यंत 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 278 रुग्णालयांनी  लाभ घेतला आहे. 

राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशात अनेक उच्चस्तरीय  आणि अनेक क्षेत्रातील तज्ञ मंडळे पाठवण्यात आली. यामुळे ती राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना कंटेनमेंट, संसर्ग पाळत, चाचण्या आणि योग्य औषधोपचार व्यवस्थापन यासाठी मदत मिळाली. देशभरातील रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रात वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्ध आहे, अशी हमी केंद्र सातत्याने देत आहे. यामुळेच महत्त्वाचा सर्वाधिक रोगमुक्तांच्या संख्येचा परिणाम साधता येत आहे, आणि मृत्यू दरातही लक्षणीय घट राखता आली. सध्या मृत्युदर 1.59 टक्के एवढा आहे.


* * *

U.Ujgare/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1657671) Visitor Counter : 223