पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान देशभरातील तंदुरुस्तीबाबत उत्साही लोकांशी संवाद साधणार


फिट इंडिया चळवळीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त फिट इंडिया संवादाचे आयोजन

Posted On: 22 SEP 2020 2:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 सप्‍टेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 सप्टेंबर 2020 रोजी फिट इंडिया चळवळीचा पहिला वर्धापन दिन साजरा करताना एका अनोख्या उपक्रमाअंतर्गत आयोजित देशव्यापी ऑनलाईन फिट इंडिया संवादादरम्यान तंदुरुस्तीबाबत उत्साही लोकांशी आणि नागरिकांशी संवाद साधतील.

ऑनलाईन संवादामध्ये सहभागी झालेले  स्वत: च्या तंदुरुस्तीबाबतचे किस्से आणि सूचना सामायिक करतील आणि  पंतप्रधानांकडून तंदुरुस्ती  आणि उत्तम आरोग्याबद्दल मार्गदर्शन घेतील. यामध्ये विराट कोहली, मिलिंद सोमण तसेच रुजुता दिवेकर सारखे फिटनेस तज्ञ भाग घेणार आहेत.

कोविड -19च्या काळात तंदुरुस्ती हा जीवनाचा सर्वात  महत्त्वाचा घटक बनला आहे. या संवादामध्ये पोषण, निरोगीपणा आणि तंदुरुस्तीबाबत इतर पैलूंवर योग्य वेळी आणि फलदायी चर्चा दिसून येईल.

पंतप्रधानांनी लोकचळवळ म्हणून मांडलेल्या संकल्पनेतून  फिट इंडिया संवाद हा देशातील नागरिकांना सहभागी करून घेऊन भारताला तंदुरुस्त राष्ट्र बनवण्याच्या योजनेसाठी आणखी एक प्रयत्न आहे. फिट इंडिया चळवळीची ज्या मूलभूत तत्त्वावर कल्पना केली गेली होती, त्यानुसार नागरिकांना तंदुरुस्त राहण्यासाठी मजेदार, सोप्या आणि विना खर्चिक मार्गांचा अवलंब  करणे आणि  वर्तनात  बदल घडवून आणणे ज्यायोगे तंदुरुस्ती प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अनिवार्य भाग बनवण्याच्या प्रयत्नाना या संवादाद्वारे बळ मिळेल.

गेल्या एका वर्षात, फिट इंडिया चळवळीच्या अंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये देशातील सर्व स्तरातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला. फिट इंडिया फ्रीडम रन, प्लॉग  रन, साइक्लोथॉन, फिट इंडिया वीक, फिट इंडिया स्कूल सर्टिफिकेट आणि इतर विविध कार्यक्रमांमध्ये साडेतीन कोटींहून अधिक लोकांचा एकत्रित सहभाग दिसून आला आहे, ज्यामुळे ती खर्‍या अर्थाने लोकचळवळ बनली आहे.

फिट इंडिया डायलॉग, ज्यामध्ये देशभरातील तंदुरुस्तीबाबत उत्साही लोकांचा सहभाग पहायला मिळणार आहे, त्यातून देशभरातील चळवळीच्या यशाचे श्रेय नागरिकांना आहे, हा विश्वास आणखी दृढ होतो.

24 सप्टेंबर रोजी दुपारी 11.30 पासून एनआयसी लिंकवर, https://pmindiawebcast.nic.in वर कोणीही फिट इंडिया संवादात सहभागी होऊ शकेल.

 

* * *

U.Ujgare/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1657690) Visitor Counter : 200