PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
14 AUG 2020 7:15PM by PIB Mumbai

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



दिल्ली-मुंबई, 14 ऑगस्ट 2020
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
दिवसाला 10 लाख चाचण्या करण्याच्या उद्देशाने चाचणी सुविधा सतत वाढविण्याचा परिणाम म्हणून, भारताने एकाच दिवसात आतापर्यंतच्या सर्वाधिक चाचण्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत 8,48,728 चाचण्या करण्यात आल्या असून यामुळे एकूण चाचण्यांची संख्या 2,76,94,416 इतकी झाली आहे.
डब्ल्यूएचओने “कोविड - 19 च्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य निकष” यासंबंधीच्या मार्गदर्शक सुचनेमध्ये संशयित रुग्णांसंदर्भात लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. देशाला दर दशलक्ष लोकसंख्येमागे दररोज 140 चाचण्या करण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
केंद्राचे प्रयत्न आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राष्ट्रीय स्तरावर दर दशलक्ष लोकसंख्येमागे दिवसाला सरासरी 603 चाचण्या होत आहे. 34 राज्य/केंद्रशासित प्रदेशांना हा टप्पा गाठला आहे. इतर राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना रुग्ण संख्येनुसार चाचणी क्षमता वाढवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
संपूर्ण देशभरात डायग्नोस्टिक लॅबचे सतत विस्तारित असणारे जाळे, “टेस्ट, ट्रॅक अँड ट्रीट” योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्य घटक आहे. देशात आजवर 1451 प्रयोगशाळा असून यामध्ये सरकारी 958 आणि 493 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.
त्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :
- रियल-टाईम RT PCR आधारित चाचणी प्रयोगशाळा: 749 (सरकारी: 447 + खाजगी: 302)
- TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 586 (सरकारी: 478 + खाजगी: 108) .
- CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 116 (सरकारी: 33 + खाजगी: 83)
जास्तीत जास्त चाचण्यांची यशस्वी अंमलबजावणी, व्यापक शोध घेणे आणि उपचार यामुळे रुग्ण बरे होण्याचं दर सुधारून 71.17 टक्के इतका झाला आहे. एकूण 17.5 लाखांहून अधिक (17,51,555) कोविड - 19 रुग्ण बरे झाले आहेत.
सक्रिय रुग्णांपेक्षा (6,61,595) बरे झालेले रुग्ण (1,089,960) 11 लाखांहून अधिक आहेत.
प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनामुळे कोविड रूग्णांच्या मृत्युदरात घट झाली असून तो आज 1.95 टक्के आहे.
इतर अपडेट्स:
- केंद्र सरकार राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने श्रेणीबद्ध, पूर्व-प्रेरक, सक्रिय आणि संयुक्त प्रतिसादामुळे कोविड-19 चे व्यवस्थापन करत आहे. देशभरातील वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी आणि त्यास बळकटी आणण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, नियमितपणे विविध धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. संक्रमणाच्या सुरुवातीच्या अवस्थेत, सर्व वैद्यकीय उपकरणे यात एन95 मास्क, पीपीई कीट, व्हेंटीलेटर्स यांचा जागतिक तुटवडा अनुभवला. यातील बहुतांश उत्पादने देशात निर्माण https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1645613होत नसल्यामुळे सुरुवातील आवश्यक घटक बाहेरुन आयात करावे लागले. संक्रमणाच्या वाढत्या परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत या घटकांचा तुटवडा निर्माण झाला होता.
- कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी संबधित सावधगिरी बाळगताना राष्ट्रीय सोहळ्याची प्रतिष्ठा आणि मांगल्य यामध्ये संतुलन राखत संरक्षण मंत्रालय 15 ऑगस्ट 2020 रोजी लाल किल्ला येथे स्वतंत्र्यदिन ध्वजारोहण सोहळा आयोजित करीत आहे.
- पुण्याच्या डीआयएटी अर्थात डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी या संस्थेने आयुर्वेदावर आधारित बायोडिग्रेडेबल फेस मास्कचे नॅनोफायबर्स विकसित केले असून ते जिवाणू/ विषाणूंना प्रतिबंध करत विषाणूंना निष्क्रिय करण्याचे कार्य करतात. त्यांना पवित्रपाती असे नाव देण्यात आले आहे. कोविड 19 विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी या उत्पादनाची मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष निर्मिती करण्यासाठी पुण्याची डीआयएटी आणि कोल्हापूरच्या सिद्धेश्वर टेक्स्टाईल्स प्रा. लि. या कंपनीदरम्यान जून 2020 मध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण करार करण्यात आला. या कंपनीने आता पवित्रपाती नावाचा आपला पहिला आयुर्वेदिक बायोडिग्रेडेबल फेस मास्क बाजारात विक्रीसाठी आणला आहे. महाराष्ट्रातील मेसर्स सिद्धेश्वर टेक्स्टाईल्स प्रा. लि. या कंपनीने सुरुवातीला 10,000 मास्क तयार केले असून वितरक, विक्री प्रतिनिधी आणि औषधनिर्मिती कंपन्यांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच हे मास्क आता ऍमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी ई कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातूनही उपलब्ध होणार आहेत.
- सध्या संपूर्ण देशभर कोविड-19 चा वाढता प्रसार लक्षात घेवून बहुतांश लोक सेंद्रिय उत्पादनाची मागणी करताना दिसत आहे. सेंद्रिय उत्पादनाला केवळ भारतामध्येच नाही तर जागतिक स्तरावर सातत्याने मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. निरोगी शरीरासाठी सुरक्षित अन्नधान्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. त्यामुळे शेतामध्ये रसायनांचा, रसायनिक खतांचा वापर करणे टाळून सेंद्रिय शेत करण्यास सिद्ध असलेल्या शेतकरी बांधवांच्या दृष्टीने चांगल्या संधी निर्माण होत आहेत.
- माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांचे नैतिक मनोधैर्य उंचावण्यासाठी एक पाऊल पुढे येत, भारतीय माहितीपट निर्माता संघटनेच्या (आयडीपीए) सहकार्याने चित्रपट विभागाच्या वतीने 17 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत `क्राउडफंडिंग` विषयावर गूगल मीटच्या माध्यमातून वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम `क्राऊडेरा` आयोजित करेल, ज्यासाठी सहभाग विनामूल्य आहे परंतु, पूर्व नोंदणी अनिवार्य आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
नागरी उड्डयन मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने राज्यात कोविड 19 च्या प्रसार रोखण्यासाठी तयार केलेले अलगीकरण्याचे नियम शिथिल केले आहेत. प्रवाशांना आता त्यांच्या प्रवासाच्या 72 तासांपूर्वी सेल्फ-डीक्लरेशन फॉर्म भरून संस्थात्मक अलगीकरणाचा पर्याय वगळता येणार आहे. अशा प्रवाशांना प्रवासाच्या 96 तासात घेण्यात आलेल्या नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणीचा पुरावा अपलोड करावा लागेल. राज्यात गुरुवारी 11,813 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर 9,115 रुग बरे झाले आहेत.
* * *
B.Gokhale/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645873)
Visitor Counter : 222
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam