आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

“आत्मनिर्भर भारत” सह भारताची आगेकूच


केवळ एका महिन्यात 23 लाख पीपीई निर्यात करुन आपले जागतिक स्थान निर्माण केले

केंद्र सरकारकडून राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांना 1.28 कोटीपेक्षा अधिक पीपीईंचे वितरण

Posted On: 14 AUG 2020 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2020

 

केंद्र सरकार राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने श्रेणीबद्ध, पूर्व-प्रेरक, सक्रिय आणि संयुक्त प्रतिसादामुळे कोविड-19 चे व्यवस्थापन करत आहे. देशभरातील वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी आणि त्यास बळकटी आणण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, नियमितपणे विविध धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.

संक्रमणाच्या सुरुवातीच्या अवस्थेत, सर्व वैद्यकीय उपकरणे यात एन95 मास्क, पीपीई कीट, व्हेंटीलेटर्स यांचा जागतिक तुटवडा अनुभवला. यातील बहुतांश उत्पादने देशात निर्माण होत नसल्यामुळे सुरुवातील आवश्यक घटक बाहेरुन आयात करावे लागले. संक्रमणाच्या वाढत्या परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत या घटकांचा तुटवडा निर्माण झाला होता.

संक्रमणाच्या परिस्थितीचे संधीत रुपांतर करण्यासाठी वैद्यकीय उपकरणांच्या स्वदेशी उत्पादनासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वस्रोद्योग मंत्रालय, औषधनिर्माण मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (डीपीआयआयटी), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि इतर विभागांनी एकत्रित प्रयत्न केले, या प्रयत्नांनी भारताची स्वतःची उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविली आहे.

पीपीईचे स्वदेशी उत्पादन मजबूत केल्यामुळे आणि देशातील गरजा पूर्ण केल्यामुळे परकीय व्यापार महासंचालक (डीजीएफटी) यांनी जुलै 2020 मध्ये (अध्यादेश क्रमांक. 16/2015-20, दिनांक 29 जून 2020) पीपीईच्या निर्यातीला परवानगी दिली. या सवलतीमुळे, जुलै महिन्यातच भारताने अमेरिका, युनायटेड किंगडम, संयुक्त अरब अमिराती, सेनेगल आणि स्लोवानिया या पाच देशांना 23 लाख पीपीई कीट निर्यात केले. यामळे पीपीईच्या जागतिक निर्यातीतील बाजारपेठेत भारताचे स्थान निर्माण झाले.

“मेक इन इंडिया’ ची चेतना आत्मनिर्भर भारत अभियानात आहे, यामुळे पीपीईसह विविध वैद्यकीय उपकरणांमध्ये भारताने स्वयंपूर्णता साध्य केली आहे. केंद्र सरकार राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पीपीई, एन95 मास्क, व्हेंटीलेटर्स इ. उपकरणे पुरवत आहे, राज्येही या उपकरणांची थेट खरेदी करत आहेत. मार्च ते ऑगस्ट 2020 दरम्यान राज्यांनी स्वतःच्या आर्थिक स्रोतांमधून 1.40 कोटी स्वदेशी पीपीईंची खरेदी केली आहे. याच कालावधीत केंद्र सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेश/केंद्रीय संस्थांना 1.28 कोटी पीपीई मोफत वितरीत केले.        

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/.आणि  @MoHFW_INDIA.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf

 


* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1645796) Visitor Counter : 223