संरक्षण मंत्रालय

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उद्या लाल किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी संरक्षण मंत्रालयाने केली विशेष व्यवस्था

Posted On: 14 AUG 2020 1:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2020


कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी संबधित सावधगिरी बाळगताना राष्ट्रीय सोहळ्याची प्रतिष्ठा आणि मांगल्य यामध्ये संतुलन राखत संरक्षण मंत्रालय 15 ऑगस्ट 2020 रोजी लाल किल्ला येथे स्वतंत्र्यदिन ध्वजारोहण सोहळा आयोजित करीत आहे. 

  • कमीतकमी गर्दी होऊन विनाअडथळा सुलभ हालचाल व्हावी यासाठी, आसन व्यवस्था आणि पादचारी मार्ग येथे लाकडी फरसबंदी आणि गालीचा घालण्यात आला आहे. रांगेत उभे राहणे टाळण्यासाठी आणि सर्व आमंत्रितांना सुरळीतपणे प्रवेश करता यावा हे सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त दरवाजाच्या अतिरिक्त मेटल डिटेक्टरची व्यवस्था केली आहे. जास्तीत जास्त व्यवहार्य मर्यादेपर्यंत वाहनांच्या सुलभ प्रवेशासाठी आणि निर्गमनासाठी बहुतेक वाहनतळ क्षेत्रामध्ये विटांच्या रांगा आणि फरसबंदी करण्यात  आली आहे.
  • सुरक्षिततेच्या दृष्टीने गार्ड ऑफ ऑनर च्या सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.  
  • मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यक्रमाच्यावेळी दोन अतिथींच्या आसन व्यवस्थेमध्ये 6 फुटाचे अंतर (दो गज की दूर) ठेवण्यात आले आहे.
  • आमंत्रितांनाच कार्यक्रमात सहभागी होता येईल आणि ज्या सदस्यांना औपचारिक आमंत्रण नाही त्यांनी सोहळ्याला उपस्थित राहू नये, अशी विनंती करण्यात आली आहे. अधिकारी, राजनैतिक अधिकारी, लोक सदस्य आणि प्रसारमाध्यमे   इत्यादींना 4000 हून अधिक आमंत्रणे देण्यात आली आहेत. 
  • सुरक्षिततेच्या दृष्टीने, एनसीसी कॅडेट्सना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे (लहान मुलांच्या ऐवजी) आणि त्यांना ज्ञानपथ येथे बसवले जाईल.
  • कोविडशी संबंधित सुरक्षा उपायांसाठी आमंत्रित व्यक्तींना संवेदनशील बनविण्यासाठी, प्रत्येक आमंत्रण पत्रिकेबरोबरच कोविडशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्यासाठी विशिष्ट सल्ला देणारे पत्र देण्यात आले आहे. कार्यक्रम संपल्यानंतर गर्दी कमी होईपर्यंत निमंत्रित व्यक्तींनी संयम आणि धीर राखावा यासाठी यासंबंधित विनंती पत्र प्रत्येक आसनावर ठेवण्यात येईल. वेळोवेळी या संदर्भातील उदघोषणा करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांच्या सल्ला -सूचनेत  या संदर्भातील टीप देखील असेल. नियंत्रण अधिकाऱ्यांच्या मार्फत पद्धतशीरपणे गर्दी पांगवण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात, सर्व आमंत्रितांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात येईल.
  • औपचारिक कवाईती मध्‍ये शारीरिक अंतराचे नियम आणि इतर सावधगिरी बाळगण्‍‍‍‍‍यात आली आहे.  
  • कार्यक्रमातील आमंत्रित व्यक्तींमध्ये प्रवेशाच्या वेळी कोविड-19 संबधित कोणतीही लक्षणे आढळल्यास व्‍यासपीठाजवळ 1, माधवदास उद्यानात 1 आणि 15 ऑगस्ट उद्यानात 2 असे एकूण 4 वैद्यकीय बूथ उभारण्यात आले आहेत. या चार ठिकाणी रुग्णवाहिकादेखील ठेवण्यात येतील.
  • सर्व प्रवेश स्थानांवर आमंत्रितांचे थर्मल स्क्रीनिंग करण्याचे नियोजन केले आहे. लाल किल्ल्याच्या आत आणि बाहेरील परिसराची नियमितपणे संपूर्ण स्वच्छता केली जात आहे.
  • सर्व आमंत्रितांना मास्क घालण्याची विनंती करण्यात आली आहे.याव्यतिरिक्त, कार्यक्रमाच्या विविध ठिकाणी योग्य प्रमाणात मास्क वितरणासाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच, पूर्वनिर्धारित ठिकाणी हॅण्ड सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. आमंत्रितांचे लक्ष वेधण्यासाठी प्रदर्शन बोर्ड लावण्यात आले आहेत.
  • सोहळ्याच्या ठिकाणाला अधिक सुशोभित करण्यासाठी ज्ञानपथ येथे एनसीसी कॅडेट्स च्या मागे फुलांची सजावट करण्यात आली आहे.


* * *

U.Ujgare/S.Mhatre/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645722) Visitor Counter : 169