माहिती आणि प्रसारण मंत्रालय

चित्रपट विभाग आणि `आयडीपीए`तर्फे माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांसाठी नीधी उभारणीवर आधारित वेबिनार

Posted On: 14 AUG 2020 6:10PM by PIB Mumbai

मुंबई, 14 ऑगस्ट 2020

 

माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांचे नैतिक मनोधैर्य उंचावण्यासाठी एक पाऊल पुढे येत, भारतीय माहितीपट निर्माता संघटनेच्या (आयडीपीए) सहकार्याने चित्रपट विभागाच्या वतीने 17 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत `क्राउडफंडिंग` विषयावर गूगल मीटच्या माध्यमातून वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम `क्राऊडेरा` आयोजित करेल, ज्यासाठी सहभाग विनामूल्य आहे परंतु, पूर्व नोंदणी अनिवार्य आहे.

वेबिनार आणि कार्यशाळा अशा संयुक्त उपक्रमात चित्रपटासाठी निधी उभारणी कशी करावी, आधुनिक निधी उभारणीच्या पद्धती, प्रकल्प कथा निर्मिती विकसित करणे (डेव्हलपिंग प्रोजेक्ट स्टोरी क्रिएशन), प्रदर्शन पूर्वीची आणि नंतरची रणनीती आखणे आणि समाज माध्यमांच्या उपयोगातून फायद करून घेणे आदी गोष्टींचा समावेश केला जाईल. याशिवाय, या विषयाशी संबंधित विषयांवर देखील यावेळी चर्चा केली जाईल. वेबिनारनंतर प्रश्नोत्तरांचे सत्र  होईल.

ना नफा तत्त्वावरील संस्थांना आणि सामाजिक संशोधकांना अर्थसहाय्य मिळवून देणाऱ्या `क्राऊडेरा` संस्थेचे श्री चेत जैन अधिवेशनाला संबोधित करतील आणि आपले अनुभव सादर करतील. ते अनुक्रमे सिलिकॉन व्हॅली, कॅलिफोर्निया आणि सिंगापूर येथील भारतीय उद्योजक आहेत आणि भारत तसेच अमेरिकेतील अनेक जागतिक पातळीवरील आघाडीच्या संघटनांबरोबर त्यांनी काम केले आहे.

fdworkshop2020[at]gmail[dot]com या ठिकाणी वेबिनारसाठी नोंदणी करता येईल आणि publicity@filmsdivision.org या ठिकाणी शंका निरसन केले जाईल किंवा 9890550861/ 8451900384 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

 

* * *

B.Gokhale/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1645842) Visitor Counter : 174
Read this release in: English