पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
21 JUL 2020 12:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
'घटनात्मक बाबींसंदर्भातले तज्ञ' असे टंडन यांचे वर्णन पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये केले आहे.
“लालजी टंडन यांनी समाजसेवेसाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी ते कायम स्मरणात राहतील. त्यांनी एक प्रभावी प्रशासक म्हणून आपली छाप पाडली आणि नेहमीच लोककल्याणाला महत्त्व दिले. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे.”, असे पंतप्रधान म्हणाले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी टंडन यांच्या दीर्घ सहवासाची आठवणही पंतप्रधानांनी यावेळी केली.
* * *
U.Ujgare/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1640144)
आगंतुक पटल : 186
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam