PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 19 JUL 2020 7:37PM by PIB Mumbai

 

 नवी दिल्ली-मुंबई, 19 जुलै 2020

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

चाचण्यांचे वाढते प्रमाण आणि वेळेवर निदान करण्याच्या केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या सक्रिय उपाययोजनांमुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध घेण्यात मदत झाली आहे. उत्तम प्रकारे अंमलबजावणी झालेल्या दर्जेदार सेवांच्या प्रोटोकॉलद्वारे मध्यम आणि गंभीर स्वरूपाच्या रुग्णांच्या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनामुळे कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. .

गेल्या  24 तासात 23,672 इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेले रुग्ण आणि उपचार सुरु असलेले रुग्ण यांच्यातील अंतर वाढून 3,04,043 इतके झाले आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 6,77,422 इतकी आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 62.86%.आहे.

एकूण 3,73,379 रुग्णांवर रुग्णालयात आणि घरी विलगीकरणात उपचार सुरु आहेत.

देशात चाचणी संबंधित पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.  आयसीएमआरच्या चाचणी धोरणानुसार कोविड चाचणीसाठी शिफारस करण्याची  सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली आहे. आरटी-पीसीआर सह रॅपिड एन्टीजिन पॉइंटऑफ केअर टेस्टिंग मुळे देशात कोविड चाचण्यांना मोठी  गती मिळाली आहे. गेल्या 24 तासात 3,58,127 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यन्त एकूण 1,37,91,869  चाचण्या झाल्या असून देशात दहा लाख लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण 9994.1.वर पोहचले आहे.

सातत्याने वाढणाऱ्या निदान प्रयोगशाळा नेटवर्कमध्ये  1262 प्रयोगशाळाचा समावेश आहे, ज्यात सरकारी क्षेत्रातील 889 आणि 373 खासगी प्रयोगशाळा आहेत.

रिअल टाइम, आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 648 (सरकारी -397 अधिक खासगी 251)

ट्रूनॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: : 510  (सरकारी -455अधिक खासगी 55)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा:104 (सरकारी - 37 अधिक खासगी  67).

केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या कोविड रुग्णांच्या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनावर केंद्रित प्रयत्नांमुळे भारतातील  मृत्यु दर 2.5% च्या खाली आला आहे. प्रभावी प्रतिबंधक धोरण , आक्रमक चाचणी आणि प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन  प्रोटोकॉलसह समग्र मानक सेवा  पध्दतीवर आधारित दृष्टिकोनामुळे  मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरित्या  घटले आहे. मृत्युदर  हळूहळू कमी होत असून सध्या तो 2.49% आहे. जगातील सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण असलेल्या देशांपैकी भारत एक आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या प्रयत्नांची जोड देऊन चाचणी आणि रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे. वृद्ध, गर्भवती महिला आणि अन्य गंभीर आजार असलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांची ओळख पटविण्यासाठी बर्‍याच राज्यांनी लोकसंख्या सर्वेक्षण केले आहे. मोबाइल अ‍ॅप्स सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने  उच्च-जोखमीची लोकसंख्या निरंतर निरीक्षणाखाली ठेवण्यास मदत झाली असून  यामुळे लवकर ओळख पटवणे,  वेळेवर वैद्यकीय उपचार आणि मृत्यू कमी करण्यास मदत झाली. त्याचबरोबर  आशा आणि एएनएम सारख्या आघाडीच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी स्थलांतरित लोकसंख्या व्यवस्थापित करण्यासाठी आणि समुदाय पातळीवर जनजागृती करण्यासाठी कौतुकास्पद काम केले आहे. परिणामी, 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी देशाच्या  सरासरीपेक्षा कमी मृत्युदर नोंदवला आहे.  5 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शून्य मृत्युदर आहे. 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा मृत्यदंर (सीएफआर) 1% पेक्षा कमी आहे. यावरून देशातील सार्वजनिक आरोग्य संस्थांनी केलेलं कौतुकास्पद काम दिसून येते.

इतर

 

महाराष्ट्र अपडेट्स

मुंबईतल्या रुग्ण संख्येने शनिवारी एक लाखाचा टप्पा ओलांडला. तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला. आणि एकूण संख्या 3,00,937 झाली. शनिवारी राज्यात 8,348 नवीन केसेस नोंद झाल्या. सोमवारपासून मुंबई उपनगरांमधील 16 पैकी 9 सरकारी रुग्णालये ही बिगर कोविड (मान्सून संबंधित) आजारांसाठी वापरण्यात येतील असे ठरवण्यात आले आहे यावरुन लक्षात येते की मुंबईत रुग्णसंख्या वाढीचा दर कमी झाला आहे

***

MC/SP/PM

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1639833) Visitor Counter : 334