विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआर–सीएमईआरआय, दुर्गापूर येथे कामाच्या ठिकाणी  कोविड संरक्षण सुविधेचे (सीओपीएस) अनावरण

Posted On: 19 JUL 2020 2:55PM by PIB Mumbai

 

सीएसआयआर – सीएमईआरआय, दुर्गापूर येथे सध्याच्या साथीच्या परिस्थितीत प्रभावी बदल घडवून आणण्यासाठी कामाच्या ठिकाणी असलेल्या कोविड संरक्षण सुविधेचे अर्थात कोविड प्रोटेक्शन सिस्टिमचे (सीओपीएस) अनावरण करण्यात आले. कार्यालयीन ठिकाणी तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणासाठी सीओपीएसचे अनावरण करताना सीएसआयआर – सीएमईआरआय, दुर्गापूरचे संचालक प्रा. (डॉ.) हरीश हिरानी म्हणाले की, “आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय, कोणत्याही संस्थांची आघाडी सांभाळणारे सुरक्षारक्षक यांना देखील संक्रमित व्यक्तींपासून आणि बाधित वा दूषित वस्तूंपासून कोविडचा धोका निर्माण होऊ शकतो. सीएसआयआर – सीएमईआरआय, दुर्गापूर हे भविष्यात लवकरच डिजिटल पद्धतीची प्रवेश व्यवस्थापन सुविधा विकसित करणार आहेत, ज्यामुळे संपूर्ण कार्यप्रक्रिया संयंत्रित होऊ शकेल आणि सर्व यंत्रणा यांत्रिक पद्धतीने चालणारी आणि इंटरनेटच्या माध्यमातून चालेल”. थर्मल स्क्नॅरसह स्पर्शरहित सौर ऊर्जेवर आधारीत इंटेलिजन्ट मास्क, ज्याचे स्वयंचलित निचरा करणारे युनिट (ऑटोमेटेड डिस्पेन्सिंग युनिट), स्पर्शरहित नळ नळ या गोष्टींचा सीओपीएसने कामाच्या ठिकाणी समावेश केला आहे आणि तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उत्पादनांच्या ऑर्डरसाठी आता 360° कार फ्लशर उपलब्ध आहेत.

डॉ. हिरानी पुढे म्हणाले की, ``सीएसआयआर – सीएमईआरआय, दुर्गापूर तंत्रज्ञान विकसित करताना उद्योजकांना पाठिंबा देणे आणि स्टार्टअप्सना  श्रेणीबद्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवते आणि त्यांच्यातील नाविन्यपूर्ण कल्पना प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांवर सीएसआयआर  - सीएमईआरआयने लक्ष  केंद्रित केले आहे, ज्यामुळे भारत सरकारने हाती घेतलेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या उपक्रमाला चालना मिळेल.``

***

S.Thakur/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1639758) Visitor Counter : 291