रसायन आणि खते मंत्रालय

सीआयपीईटीला पीपीई किटची चाचणी आणि प्रमाणीकरणासाठी  एनएबीएलकडून  मान्यता

या कामगिरीबद्दल गौडा यांनी सीआयपीईटीचे केले अभिनंदन

Posted On: 19 JUL 2020 4:11PM by PIB Mumbai

 

 रसायने आणि खते मंत्रालय, रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभाग यांच्या अखत्यारीतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी  (सीआयपीईटी) या सर्वोच्च स्तरावरील संस्थेला पीपीई किटची चाचणी आणि प्रमाणीकरणासाठी राष्ट्रीय चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळा मान्यता मंडळाची (एनबीएएल) मान्यता प्राप्त झाली आहे.

पीपीई किटमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे  ग्लोव्हज, कव्हरऑल , फेस शिल्ड आणि गॉगल्स तसेच  ट्रिपल लेयर मेडिकल मास्क इत्यादींचा समावेश आहे.

कोविड - 19 महामारीविरोधातील लढ्यात सीआयपीईटीचे हे आणखी एक यश असून 'आत्मनिर्भर भारताच्या ’ दिशेने एक पाऊल आहे.

सीआयपीईटी: आयपीटी सेंटर भुवनेश्वर यांनी पीपीई किटची चाचणीची सुविधा विकसित केल्यानंतर  मान्यता प्राप्त करण्यासाठी एनएबीएलकडे अर्ज सादर केला होता. त्याच्या चाचणी सुविधेचे ऑनलाईन ऑडिट झाल्यानंतर एनबीएलने सीआयपीईटी-केंद्र भुवनेश्वर यांना मान्यता दिली. इतर काही सीआयपीईटी केंद्रांनीही मान्यतेसाठी अर्ज केले असून ते विचाराधीन आहेत.

केंद्रीय रसायने आणि  खते मंत्री  डी. व्ही सदानंद गौडा यांनी सीआयपीईटी: आयपीटी सेंटर भुवनेश्वर यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आणि देशाची सेवा करण्याचे काम असेच सुरु ठेवण्याचे .आणि एमएसएमईला मेक इन इंडियावर लक्ष केंद्रित करायला मदत करण्याचे आवाहन केले.

डब्ल्यूएचओ/आयएसओ मार्गदर्शक सूचनांनुसार सीआयपीईटी आरोग्यसेवा क्षेत्रात संशोधन आणि विकास उपक्रम राबवत आहे.

सीआयपीईटीने कोविड महामारी दरम्यान आवश्यक सेवांना मदत करण्यासाठी अन्नधान्य आणि खतांच्या  पॅकेजिंगची चाचणी करण्याची क्षमता वाढवली आहे.

****

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1639782) Visitor Counter : 56