आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताचा कोविड रुग्णांचा मृत्युदर प्रथमच 2.5% च्या खाली घसरला


29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी मृत्युदर नोंदवला

Posted On: 19 JUL 2020 3:36PM by PIB Mumbai

 

केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या कोविड रुग्णांच्या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनावर केंद्रित प्रयत्नांमुळे भारतातील  मृत्यु दर 2.5% च्या खाली आला आहे. प्रभावी प्रतिबंधक धोरण , आक्रमक चाचणी आणि प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन  प्रोटोकॉलसह समग्र मानक सेवा  पध्दतीवर आधारित दृष्टिकोनामुळे  मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरित्या  घटले आहे. मृत्युदर  हळूहळू कमी होत असून सध्या तो 2.49% आहे. जगातील सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण असलेल्या देशांपैकी भारत एक आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या प्रयत्नांची जोड देऊन चाचणी आणि रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे. वृद्ध, गर्भवती महिला आणि अन्य गंभीर आजार असलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांची ओळख पटविण्यासाठी बर्‍याच राज्यांनी लोकसंख्या सर्वेक्षण केले आहे. मोबाइल ‍ॅप्स सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने  उच्च-जोखमीची लोकसंख्या निरंतर निरीक्षणाखाली ठेवण्यास मदत झाली असून  यामुळे लवकर ओळख पटवणे,  वेळेवर वैद्यकीय उपचार आणि मृत्यू कमी करण्यास मदत झाली. त्याचबरोबर  आशा आणि एएनएम सारख्या आघाडीच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी स्थलांतरित लोकसंख्या व्यवस्थापित करण्यासाठी आणि समुदाय पातळीवर जनजागृती करण्यासाठी कौतुकास्पद काम केले आहे. परिणामी, 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी देशाच्या  सरासरीपेक्षा कमी मृत्युदर नोंदवला आहे5 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शून्य मृत्युदर आहे. 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा मृत्यदंर (सीएफआर) 1% पेक्षा कमी आहे. यावरून देशातील सार्वजनिक आरोग्य संस्थांनी केलेलं कौतुकास्पद काम दिसून येते.

.

राज्याचे /केंद्रशासित प्रदेशाचे नाव

रुग्ण मृत्युदर  (%)

राज्याचे /केंद्रशासित प्रदेशाचे नाव

रुग्ण मृत्युदर  (%)

मणिपूर

0.00

हिमाचल प्रदेश

0.75

नागालँड

0.00

बिहार

0.83

सिक्कीम

0.00

झारखंड

0.86

मिझोराम

0.00

तेलंगण

0.93

अंदमान आणि निकोबार बेटे

0.00

उत्तराखंड

1.22

लडाख (UT)

0.09

आंध्र प्रदेश

1.31

त्रिपुरा

0.19

हरियाणा

1.35

आसाम

0.23

तामिळनाडू

1.45

दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव

0.33

पुदुच्चेरी

1.48

केरळ

0.34

चंदीगड

1.71

छत्तीसगड

0.46

जम्मू आणि काश्मीर

1.79

अरुणाचल प्रदेश

0.46

राजस्थान

1.94

मेघालय

0.48

कर्नाटक

2.08

ओदिशा

0.51

उत्तर प्रदेश

2.36

गोवा

0.60

 

 

 

कोविड-19 शी संबंधित तांत्रिक विचारणा  : technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर मुद्दे  ncov2019[at]gov[dot]in  आणि @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड-19 संदर्भात काही शंका असल्यास कृपया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर संपर्क साधा.. कोविड-19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf   वर उपलब्ध आहे.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1639772) Visitor Counter : 382