गृह मंत्रालय
केंद्र सरकारच्यावतीने कोणाही व्यक्ती अथवा संस्थेला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ)मध्ये योगदान देण्याची अनुमती
Posted On:
18 JUL 2020 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2020
केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी ‘आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 46(1)(बी) अनुसार कोणाही व्यक्ती अथवा संस्थेला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) मध्ये योगदान देण्याची अनुमती देण्यासंबंधी प्रक्रिया निर्धारित केली आहे. यानुसार कोणाही व्यक्ती अथवा संस्थेला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमध्ये खालील पद्धतीने अंशदान/योगदान देता येणार आहे.
- प्रत्यक्ष उपकरणे, सामुग्रीच्या माध्यमातून - ‘‘गृहमंत्रालय पीएओ(सचिवालय)नवी दिल्ली’’ यांच्यासाठी, ‘‘राष्ट्रीय आपत्ती निवारणासाठी योगदान म्हणून’’ असा त्या उपकरणाच्या, सामुग्रीच्या मागच्या बाजूला स्पष्ट उल्लेख करण्यात यावा.
- आरटीजीएस, एनईएफटी, यूपीआय यांच्याव्दारे - राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमध्ये योगदान देण्यासाठी आरटीजीएस, एनईएफटी या पेमेंट माध्यमांचा वापर करता येवू शकतो. दान करणारे इच्छुक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खाते क्रमांक 10314382194 यामध्ये निधी जमा करू शकतात. या बँक शाखेचा आयएफएससी कोड SBIN0000625, असा आहे.
- भारतकोष पोर्टल - नेटबँकिंग, डेबिट कार्डस, क्रेडिट कार्डस आणि यूपीआय वापरून https://bharatkosh.gov.in यापोर्टलवरून निधी हस्तांतरित करता येवू शकतो. त्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी.
- https://bharatkosh.gov.in या पोर्टलच्या होमपेज वर जाऊन ‘क्विक पेमेंट’ या पर्यायावर क्लिक करावे.
- यानंतरच्या पेजवर मंत्रालयाच्या निवडीमध्ये ‘होम अफेअर्स’ निवडून ‘प्रयोजन’ म्हणून ‘‘एनडीआरएफमध्ये योगदान/अंशदान’’ याची निवड करावी आणि पेमेंट करण्यासाठी वेबसाईटवर दिलेल्या मार्गदर्शनानुसार कृती करावी.
* * *
S.Tupe/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1639667)
Visitor Counter : 362