PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
01 JUN 2020 7:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली-मुंबई 1 जून 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळूरू येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या 25 व्या स्थापना दिनानिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. कोविड-19 परिस्थिती हाताळण्यासाठी कर्नाटक सरकारने केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. मोदी म्हणाले की, दोन जागतिक महायुद्धांनंतर आता संपूर्ण जगाला ह्या संकटाचा सामना करावा लागला आहे. जागतिक महायुद्धाच्या आधी आणि नंतर जसे संपूर्ण जगात बदल झाले तसेच कोविड च्या आधीच्या आणि नंतरच्या जगात देखील फरक असेल. मोदी म्हणाले की, कोविड-19 विरुद्धच्या भारताच्या साहसी लढाईचे मूळ हे आमच्या वैद्यकीय समुदायाच्या आणि कोरोना योद्धयांच्या कठोर परिश्रमात आहे. त्यांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तुलना सैनिकांशी केली परंतु असे सैनिक ज्यांनी सैनिकांचा गणवेश परिधान केलेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची सोमवारी 1 जून 2020 रोजी बैठक झाली. केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळात प्रवेश केल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक होती. या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले ज्याचा परिवर्तनात्मक प्रभाव भारताचे मेहनती शेतकरी, एमएसएमई क्षेत्र आणि रस्त्यावर फेरीवाले विक्रेते म्हणून काम करणाऱ्यांच्या जीवनावर दिसून येईल.
अडचणीतील एमएसएमईंना समभाग मूल्य समर्थन देण्यासाठी 20,000 कोटी रुपयांच्या दुय्यम कर्जाच्या तरतुदीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळाने औपचारिक मान्यता दिली. याचा फायदा तब्बल 2 लाख एमएसएमईंना होईल.केंद्र सरकारने आज एमएसएमई व्याख्येच्या उन्नतीकरणाचा निर्णय घेतला. एमएसएमई विकास कायदा 2006 मध्ये अस्तित्त्वात आल्यानंतर 14 वर्षांनी यात सुधारणा करण्यात आली आहे.
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने रस्त्यावरील फेरीवाल्यांना परवडणारी कर्जे देण्यासाठी पीएम स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भरनिधी - पीएम स्व निधी - ही विशेष सूक्ष्म पत सुविधा योजना सुरू केली आहे. ही योजना त्यांना पुन्हा काम करण्यास सक्षम बनविण्यास आणि उदरनिर्वाहासाठी कमालीची मदत करेल. सुमारे 50 लाख लोकांना या योजनेचा फायदा होण्याची शक्यता आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सोबत भारत सरकार श्रेणीबद्ध, पूर्व नियोजित आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून अनेक पावले उचलत आहे. उच्च स्तरावर याविषयी नियमितपणे पुनरावलोकन आणि परीक्षण केले जात आहे.
गेल्या 24 तासात 4,835 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण 91,818 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत असून ते आता 48.19 % वर पोहोचले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 18 मे रोजी 38.29 % होते. 3 मे रोजी 26.59 % तर 15 एप्रिल रोजी 11.42 % होते.
आजमितीस सक्रिय वैद्यकीय परीक्षणाखाली 93,322 रुग्ण आहेत. मृत्यू दर 2.83% आहे. 18 मे रोजी मृत्यू दर 3.15% तर 3 मे रोजी 3.25 % होता तर 15 एप्रिल रोजी 3.30 % होता. देशात मृत्यू दर सातत्याने कमी होताना दिसत आहे. सातत्याने सर्वेक्षणावर भर, वेळेवर निदान करणे आणि रुग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन यामुळे तुलनेने मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे.
अशा प्रकारे दोन विशिष्ट बदल लक्षात घेतले जात आहेत, एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना, दुसरीकडे मृत्यू दर कमी होत आहे.
472 शासकीय आणि 204 खाजगी प्रयोगशाळांद्वारे (एकूण 676 प्रयोगशाळांद्वारे) चाचणी क्षमता वाढली आहे. यात एकत्रितपणे कोविड -19 साठी आतापर्यंत एकूण, 38,37,207 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे, तर काल 1,00,180 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
इतर अपडेट्स:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘माय लाईफ माय योगा’ (जीवन योगा) या व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धेत प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन ‘मन की बात’ या देशवासियांशी संवाद साधणाऱ्या मासिक कार्यक्रमामध्ये केले आहे. आयुष मंत्रालय आणि आयसीसीआर, भारतीय सांस्कृतिक संबंध विषयक परिषद यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली आहे. योग केल्याने व्यक्तीच्या जीवनावर होणारा परिवर्तनात्मक प्रभाव आणि येत्या 21 जूनला येणाऱ्या सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाशी संबंधित कार्यक्रम म्हणून स्पर्धेत लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.आयुष मंत्रालयाच्या सोशल मिडिया हॅन्डल वर आज, 31 मे 2020 ला ही स्पर्धा लाईव झाली आहे.
- राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ म्हणजेच एनटीपीसी या सर्वात मोठ्या ऊर्जा उत्पादन क्षेत्रातल्या केंद्रीय सार्वजनिक संस्थेचे कामकाज ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत केले जाते. या संस्थेने कोविड-19 महामारीमुळे जारी झालेल्या टाळेबंदीच्या काळात आपल्या 19,000 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी बांधवांसाठी आणि त्यांच्या परिवारातल्या सदस्यांसाठी नवीन डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकण्याची आणि आपल्यामध्ये विकास घडवून आणण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.
- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्याशी सल्लामसलत करून रेल्वे मंत्रालयाने 01 जून 2020 पासून भारतीय रेल्वेची रेल्वे सेवा अंशतः सुरु करण्याची घोषणा केली आहे. 1 जूनपासून सुरू होणार्या 200 गाड्यांमधून पहिल्याच दिवशी 1.45 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतील. 1 जून 2020 पासून खाली जोडलेल्या परिपत्रकानुसार भारतीय रेल्वे उद्या (म्हणजे 1 जून 2020) 200 प्रवासी गाड्या सुरु करणार आहे.
- भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालय (पीआयबी), मुंबईचे छायाचित्रकार, श्रीधर पाटील यांचं आज सकाळी निधन झालं. ते 55 वर्षांचे होते. पाटील गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर मुंबईच्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 15 दिवसांपूर्वी त्यांना कोविड19 ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
महाराष्ट्र अपडेट्स
2,487 नवीन केसेस सहित महाराष्ट्रातील कोविड-19 रुग्ण संख्या 67,655 झाली आहे. यापैकी 29,329 केसेस बऱ्या झाल्या आहेत तर 2,286 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान महाराष्ट्र पोलीस दलातील 8 अधिकाऱ्यांसहित आणखी 93 कर्मचारी कोविड-19 पॉझिटिव ठरले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या 2,509 झाली आहे. यांपैकी 27 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रस्ते, रेल्वे तसेच हवाई आंतरराज्यीय वाहतूक महाराष्ट्रात 30 जून पर्यंत प्रतिबंधित राहील, परंतु यातून श्रमिक ट्रेन, अडकलेल्या व्यक्ती, स्थलांतरित कामगार या सर्वांना सूट देण्यात आली आहे
PIB FACT CHECK


*****
RT/MC/SP/PK
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1628388)
Visitor Counter : 348
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam