PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

कोविड-19 मुळे उद्‌भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी देश तयार: डॉ हर्ष वर्धन

Posted On: 12 MAY 2020 7:40PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, May 12, 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 मे रोजी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोविड -19 च्या विरोधात भारताच्या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी चर्चा केली.आपल्या प्रारंभिक संबोधनात पंतप्रधान म्हणाले की, भारतात सर्वात जास्त बाधित क्षेत्रांसह कोणकोणत्या भौगोलिक भागात महामारी पसरली आहे याचे स्पष्ट संकेत आता आपल्याकडे आहेत.  तसेच गेल्या काही आठवड्यात अशा प्रकारची परिस्थिती , अगदी जिल्हा पातळीपर्यंत कशी हाताळायची याबाबतच्या परिचालन प्रक्रिया अधिकाऱ्यांनी व्यवस्थित समजून घेतल्या आहेत. "पंतप्रधान म्हणाले की कोविड-19 च्या प्रसाराबाबत ही माहिती देशाला याविरोधात अधिक लक्षपूर्वक लढा देण्यात उपयुक्त ठरेल.

आज रात्री 8 वाजता पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधणार आहेत.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज नवी दिल्लीत उच्च स्तरीय बैठक घेतली. आजची बैठक म्हणजे राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांची कोविड-19 व्यवस्थापनासंदर्भातली तयारी आणि उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी विविध राज्यांचे  आरोग्य मंत्री आणि रेड झोन जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या समवेत संवाद साधण्याच्या बैठक मालिकेचा एक भाग होती.

12 मे 2020 पर्यंत देशात एकूण 70,756 रुग्ण असून 22,455 जण  बरे झाले तर  2,293 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या 24 तासात,3,604 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 1,538 रुग्ण बरे झाले आहेत.  गेल्या 14 दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 10.9 होता तर गेल्या तीन दिवसात त्यात सुधारणा होऊन तो 12.2 झाला आहे. मृत्यू  दर 3.2% आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 31.74 % आहे. कालपर्यंत कोविड-19 रुग्णांपैकी 2.37 % रुग्ण अति दक्षता विभागात, 0.41% रुग्ण व्हेंटीलेटरवर तर 1.82 %रुग्ण ऑक्सीजन प्रणालीवर असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात निदान चाचण्यांची क्षमता वाढून 1,00,000 प्रतिदिन झाली आहे. 347  सरकारी प्रयोगशाळा तर 137  खाजगी प्रयोगशाळा  आहेत. आतापर्यंत 17,62,840 चाचण्या करण्यात आल्या तर काल   86,191 नमुने तपासण्यात  आल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्ये तसेच केंद्र शासित प्रदेश यांच्या  समन्वित प्रयत्नातून योग्य उपाययोजना करण्यात येत असून कोविड समर्पित रुग्णालये,अलगीकरण आणि आयसीयु खाटा,यांची संख्या वाढवण्यात येत असून  क्वारंटाईन केंद्र निश्चित आणि विकसित करण्यात येत आहेत.कोविड-19 मुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी देश तयार असल्याचा   विश्वास यातून मिळत असल्याचे ते म्हणाले.राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय संस्थाना  पुरेसे मास्क आणि पीपीई साधने, व्हेंटीलेटर इत्यादी साहित्य पुरवून केंद्र सरकारही सहाय्य करत असल्याचे ते म्हणाले.

कोविड-19 रुग्णांसंदर्भात आणि व्यवस्थापना बाबत राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशाचे सादरीकरण झाल्यानंतर, स्थलांतरित मजूर आपापल्या गावी परतत  आहेत हे लक्षात घेऊन राज्य आणि केंद्रशासित प्रदेशानी अधिक प्रभावी देखरेख, संपर्कातील व्यक्तींचा शोध, पुरेशा चाचण्या आणि योग्य वेळी उपचार  यावर लक्ष केंद्रित करायला हवे असे ते म्हणाले. परदेशातून येणाऱ्या  व्यक्तींसाठीही ही पद्धती ठेवावी. देखरेख आणि योग्य  वैद्यकीय मदत शक्य व्हावी या दृष्टीने परतणाऱ्या सर्व व्यक्तींनी आरोग्य सेतू ऐप डाऊन लोड करणे अत्यावश्यक करावे याअशा सूचना त्यांनी दिल्या.

बाधित आणि बाधित नसलेल्या जिल्ह्यातही एसएआरआय-सारी, आयएलआय साठी निगराणी वाढवावी यावर त्यांनी भर दिला.राज्य आणि केंद्र शासित प्र्देशानी त्यांच्याकडे वैद्यकीय महाविद्यालये असतील तर त्यांची मदत घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.अशा उपायांमुळे,एखादा छुपा संसर्ग असल्यास तो लवकर लक्षात येऊन वेळीच रोखता येईल. उत्तराखंड मधे सारी/आयएलआय देखरेख विषयक काम,संपर्कातल्या व्यक्तींचा शोध आणि देखरेख याबाबत आयडीएसपीच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली.

इतर अपडेट्स :

 • केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने एक मोठा उपक्रम हाती घेत, www.Champions.gov.in या चॅम्पियन्स पोर्टलचे आज उद्‌घाटन केले. हे एक तंत्रज्ञान आधारित नियंत्रण कक्ष आणि व्यवस्थापन माहिती व्यवस्था असलेले पोर्टल आहे. या व्यवस्थेत आधुनिक टूल्स चा उपयोग करण्यात आला असून त्याचे उद्दिष्ट भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चॅम्पियन्स  होण्यास मदत करणे हे आहे.
 • केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालायाचे गोवा विज्ञान केंद्र, कोरोना संबंधित काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी चेहऱ्यावर लावण्याचे संरक्षक आवरण तयार करत आहेत. याकरिता हे केंद्र आपल्या ‘इनोव्हेशन हब’ मधील ‘थ्री डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’चा वापर करीत असुन ही संरक्षक आवरणे गोवा सरकारच्या आरोग्य विभागाला पुरविली जात आहेत
 • लोकांच्या  जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या देशातल्या सर्व वैज्ञानिकांची  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधानांनी ट्वीट केले होते. 'जगाला कोविड-19 पासून मुक्त करण्याच्या प्रयत्नांत तंत्रज्ञान अनेकांना मदत करत आहे. कोरोना विषाणूवर विजय मिळवण्यासाठी संशोधन करण्यात अग्रेसर असणाऱ्या  सर्वांना माझा सलाम. आपला ग्रह आरोग्यसंपन्न  आणि  उत्तम  करण्यासाठी तंत्रज्ञानाशी आपण  सांगड घालत  राहू या' असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
 • कोविड-19च्या विरोधातील लढ्यामध्ये भारत अतिशय खंबीर आणि सातत्यपूर्ण वाटचाल करत आहे असे, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, भूविज्ञान आणि आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन प्रबंधांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेची नवी सुरुवात, नवी चालना’ या डिजिटल परिषदेमध्ये बोलत होते.
 • भारताने स्वयंपूर्ण तसेच तंत्रज्ञानाचे निव्वळ निर्यातदार व्हावे अशी अपेक्षा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली. कोविड 19 ने उभ्या केलेल्या आव्हानांशी संरक्षण क्षेत्रातल्या संस्था अत्याधुनिक तंत्रज्ञानानिशी लढा देत आहेत असेही राजनाथ सिंग यांनी सांगितलं. या अदृश्य शत्रूने उभ्या केलेल्या आव्हानांवर  तोडगे काढण्यासाठी  भारताचे संरक्षण दले तसेच संशोधन आणि विकास  क्षेत्र   संपूर्णपणे प्रयत्न करत आहे. 
 • जेव्हा कोविड -19 विरुद्धच्या  लढ्यामध्ये एखादी खूप छोटीशी गोष्ट सुद्धा आशा पल्लवित करते, अशा वेळी राजस्थानच्या ग्रामीण भागातील खादी आणि ग्रामोद्योग अंतर्गत येणारे  कुंभार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी त्यांच्या अनोख्या मोहिमेद्वारे देशाचे लक्ष वेधून घेत आहेत. राजस्थानमधील बारण जिल्ह्यातील किशनगंज गावातील या कुंभारांनी बनविलेल्या प्रत्येक मातीच्या भांड्यात, विशेषत: मडक्यावर कोरोनाशी लढण्याबाबतचा संदेश आहे.
 • एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची भुवनेश्वर, जमशेदपूर आणि कोलकाता ही तंत्रज्ञान केंद्रे, आता विशाखापट्टणममधील एएमटीझेड अर्थात आंध्रप्रदेश वैद्यकीय उपकरणे उत्पादन करणाऱ्या पार्कसाठी अद्ययावत वेळेनुसार परिणाम वाचक सूक्ष्म पीसीआर प्रणालीच्या क्लिष्ट भागांची निर्मिती करीत आहेत. हे यंत्र 1 तासापेक्षा कमी कालावधीत कोविड 19 चाचणी निकाल देऊ शकते
 • गांधी शांतता पुरस्कारासाठी दरवर्षी सांस्कृतिक मंत्रालयाकडून नामांकने मागवली जातात. यावर्षी, 2020 साठी नामांकने पाठवण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2020 होती. देशभरात covid-19  लॉकडाऊन असल्यामुळे गांधी शांतता पुरस्कार 2020 साठी नामांकने  मागवण्याची अंतिम तारीख 15 जून 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
 • रेल्वे मंत्रालयाने आरोग्य आणि गृह मंत्रालयाशी सल्लामसलत करुन प्रवासी सेवा अंशतः सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 12 मे 2020 पासून टप्याटप्याने गाड्या सोडल्या जाणार आहेत.
 • कोविड-19 महामारी लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने 29 एप्रिलला परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना आणि शैक्षणिक कॅलेंडर जारी केले.सर्व विद्यापीठांनी शैक्षणिक कार्यक्रम आखताना सर्व संबंधीतांचे हित आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत, मार्गदर्शक  सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी,शिक्षक आणि संस्थांच्या कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या शंका, तक्रारी आणि इतर शैक्षणिक बाबींविषयी लक्ष घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने खालील  पाऊले उचलली आहेत
 • देशाच्या विविध भागात अडकलेले स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींना विशेष रेल्वेने आपल्या मूळ गावी परत जाता यावे याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर रेल्वेने श्रमिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. 12 मे 2020 पर्यंत देशाच्या विविध राज्यातून 542 श्रमिक विशेष गाड्या चालवण्यात आल्या, यापैकी 448 गाड्या आपल्या नियोजित स्थानी पोहोचल्या तर 94 गाड्या आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचण्याच्या मार्गावर आहेत.
 • कोविड नंतरच्या परिस्थितीत, अर्थव्यवस्था, व्यापार, विज्ञान संशोधन आणि इतर विविध क्षेत्रात नव-नवे  शोध  येण्याच्या  शक्यतेसह नवे  प्रतिमान सामोरे येईल असे केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. आसोचामने आयोजित केलेल्या भारत- बांगलादेश आभासी परिषदेला ते संबोधित करत होते.

महाराष्ट्र अपडेट्स

राज्यातील कोविड-19 ची एकूण रुग्ण संख्या 23,401 आहे. पहिला रुग्ण सापडल्यानंतर दोन महिन्यांनी मुंबईतील रुग्णसंख्या 14,355 झाली आहे. राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांमधील कोविड-19 चा संसर्ग वाढत आहे. 106 अधिकारी तर 901 कॉन्स्टेबलना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. नागपुर मधील कोविड-19 केसेसची संख्या 300 झाली आहे. आज आणखी दोन केसेसची येथे नोंद झाली. कोविड-19 संसर्गामुळे नागपूरमध्ये आजवर चार मृत्यू झाले आहेत.

FACT CHECK

***

 

RT/MC/SP/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1623358) Visitor Counter : 60