शिक्षण मंत्रालय
विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थांच्या कोविड-19 मुळे उद्भवलेल्या शंका, तक्रारी,आणि इतर शैक्षणिक बाबींविषयी लक्ष घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने उचलली पाऊले
प्रविष्टि तिथि:
11 MAY 2020 12:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2020
कोविड-19 महामारी लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने 29 एप्रिलला परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना आणि शैक्षणिक कॅलेंडर जारी केले.सर्व विद्यापीठांनी शैक्षणिक कार्यक्रम आखताना सर्व संबंधीतांचे हित आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत, मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.
या महामारीमुळे परीक्षा आणि इतर शैक्षणिक बाबींशी संबंधित उद्भवलेल्या, विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी एक कक्ष स्थापन करून त्याबाबत विद्यार्थ्यांना सूचित करावे अशा सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थी,शिक्षक आणि संस्थांच्या कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या शंका, तक्रारी आणि इतर शैक्षणिक बाबींविषयी लक्ष घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने खालील पाऊले उचलली आहेत-
- समर्पित मदत क्रमांक 011-23236374 देण्यात आला आहे.
- covid19help.ugc[at]gmail[dot]com हा ई मेल एड्रेस निर्माण करण्यात आला आहे.
- विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विद्यार्थी तक्रार निवारण या सध्याच्या https://www.ugc.ac.in/grievance/student_reg.aspx ऑनलाईन पोर्टलवरही विद्यार्थी तक्रार नोंदवू शकतात.
- विद्यार्थी, शिक्षक आणि संस्था यांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी एक कृती दलही स्थापन करण्यात आले आहे.
सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी या सार्वजनिक नोटीसची एक प्रत आपल्या अधिकृत संकेत स्थळावर अपलोड करावी आणि ई मेल किंवा इतर डिजिटल माध्यमातून शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यापर्यंत ती पोहोचवावी.
M.Jaitly/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1623203)
आगंतुक पटल : 268
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam