• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
सांस्कृतिक मंत्रालय

कोविड-19 विरूद्धच्या लढ्यात गोवा विज्ञान केंद्राव्दारे थ्री डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा वापर


नागरिकांसाठी इतरही ‘ऑनलाईन’उपक्रम सुरू

Posted On: 12 MAY 2020 4:00PM by PIB Mumbai

पणजी,  12 मे 2020

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालायाचे गोवा विज्ञान केंद्र, कोरोना संबंधित काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी चेहऱ्यावर लावण्याचे संरक्षक आवरण तयार करत आहेत. याकरिता हे केंद्र आपल्या ‘इनोव्हेशन हब’ मधील ‘थ्री डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’चा वापर करीत असुन ही संरक्षक आवरणे गोवा सरकारच्या आरोग्य विभागाला पुरविली जात आहेत.

थ्री डी प्रिंटर कसे काम करते ते इथे पाहता येईल: https://twitter.com/PIB_Panaji/status/1260117492632084481?s=20

याशिवाय टाळेबंदी कालावधीत गोवा विज्ञान केंद्राने सार्वजनिक तसेच केंद्र सदस्यांसाठी नियमित कार्यक्रम आयोजित केले आहेत; तसेच यासाठी ‘ऑनलाइन’ सुविधेचा वापर करण्यात येत आहे. गोवा विज्ञान केंद्र आणि राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेतर्फे माहितीचा प्रसार जाणून घेण्यासाठी विविध ‘ऑनलाईन’ माध्यमातून प्रश्नमंजुषा घेण्यात आली. याव्यतिरिक्त घरातून करता येण्यासारखे उपक्रम, मेंदूला चालना देणारी कोडी अश्याही गोष्टी घेण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्ताने वैज्ञानिक खेळणी तयार करण्याची स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती.

गोवा विज्ञान केंद्राने आंतरराष्ट्रीय संग्रहालय व आपल्या संविधान दिनानिमित्त अनुक्रमे 14 व 20 मे रोजी देखील कार्यक्रम आखले आहेत.

गोवा विज्ञान केंद्रापर्यंत खालील माध्यमातून पोहचू शकता:

संकेतस्थळ: www.sciencecentre.goa.gov.in

ट्विटर: https://twitter.com/GSCPGoa

फेसबुक: https://www.facebook.com/GSCPGoa

यू ट्यूब: bit.ly/3bqCSDo

गोवा विज्ञान केंद्र, विज्ञान व तंत्रज्ञानातील शैक्षणिक-मनोरंजनाचे ठिकाण म्हणून विकसित केले जात आहे. सर्वसामान्यांमध्ये विज्ञानाबद्दलची गोडी व उत्साह निर्माण करणे, हा गोवा विज्ञान केंद्राचा उद्देश आहे.

 

 

B.Gokhale/S.Pophale/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1623273) Visitor Counter : 158

Read this release in: English

Link mygov.in