ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय

कोविड नंतरच्या काळात अर्थव्यवस्था, व्यापार, विज्ञान संशोधन आणि इतर क्षेत्रात नव-नवे शोध सामोरे येण्याची शक्यता-डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 11 MAY 2020 8:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  11  मे 2020

कोविड नंतरच्या परिस्थितीत, अर्थव्यवस्था, व्यापार, विज्ञान संशोधन आणि इतर विविध क्षेत्रात नव-नवे  शोध  येण्याच्या  शक्यतेसह नवे  प्रतिमान सामोरे येईल असे केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. आसोचामने आयोजित केलेल्या भारत- बांगलादेश आभासी परिषदेला ते संबोधित करत होते. बांगलादेशचे वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी,मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा, बांगलादेशसाठीच्या उच्चायुक्त रीवा गांगुली दास या बैठकीला उपस्थित होते. गेल्या सहा वर्षात ईशान्य भागाने त्यापूर्वीच्या काळातल्या अनेक त्रुटी भरून काढल्या आहेत कारण देशाच्या इतर भागांप्रमाणेच या भागाकडे प्रथमच लक्ष पुरवले जात आहे. यामुळे या भागातल्या जनतेत विश्वास निर्माण होण्याबरोबरच देशाच्या इतर भागा बरोबर आणि पूर्वेकडच्या सीमेलगतच्या देशाशीही  संबंध  वृद्धिगत करण्याची क्षमता वाढली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत- बांगलादेश यांच्यात भू भाग अदलाबदल करण्यासंदर्भातल्या करारामुळे,व्यापार,प्रवास आणि ये-जा करण्याचा मार्ग सुरळीत झाला, याआधी हे बिकट काम होते.साडेचार दशकापुर्वी, बांगलादेश निर्मितीच्या वेळीच हे काम करणे उचित होते मात्र तत्कालीन सरकारने,कदाचित याला प्राधान्य दिले नसावे असे त्यांनी सांगितले.दोनही देशातल्या पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख करत, इतर काही देशांपेक्षा बांगला देश बरोबर व्यापार करणे खूपच सुलभ आहे. या दोन देशातल्या व्यापार आणि व्यवसायाला चालना देण्यात ईशान्येकडच्या भागाला  महत्वाची भूमिका बजावायची आहे असे ते म्हणाले.

येत्या काळात ईशान्येकडचा बांबू केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण उपखंडात, विशेषतः बांगला देश सारख्या पूर्वेकडच्या देशात, व्यापाराचे महत्वाचे साधन ठरणार आहे. उभय देशातल्या व्यापारासाठी प्रोत्साहन दिले जाऊ शकते अशा अनेक वस्तूंचा उल्लेख त्यांनी केला. त्यांनी कोळसा, आले,यासारख्या वस्तू निर्यातीसाठी तर सिमेंट, पीव्हीसी पाईप यासारख्या वस्तू आयातीसाठी असल्याचे उदाहरणादाखल त्यांनी सांगितले.असोचाम सारख्या व्यापार आणि व्यवसाय संस्थांनी पुढे येऊन सार्वजनिक-खाजगी  सहभागातून परस्पर लाभासाठी नवे उद्योग आणि व्यवसायाला चालना देण्याचे आवाहन त्यांनी केले.

सरकार सक्षम भूमिका बजावत असताना संसाधने आणि भांडवल यांच्यातली तफावत  कमी करण्यासाठी व्यापार आणि उद्योग संघटनांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

M.Jaitly/N.Chitale/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1623257) Visitor Counter : 215