भारतीय निवडणूक आयोग
कोविड विरोधी लढ्यासाठीच्या निधीत मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त त्यांच्या मूळ वेतनाच्या 30 टक्के रक्कम वर्षभर देणार
Posted On:
13 APR 2020 2:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल, 2020
सध्या जगासोबत भारतही covid-19 महामारिशी झुंजत आहे. या महामारीचा प्रकोप रोखण्यासाठी उपाययोजना करणे तसंच त्याचा सार्वजनिक आरोग्यावर परिणाम न होऊ देणे, सार्वजनिक आरोग्याची जपणूक त्याचप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था रुळावर ठेवणे हे अत्यंत कठीण काम सरकार तसेच अन्य संस्था करत आहेत. यासंबंधी उपाययोजना करत असताना जी असंख्य पावले उचलली जात आहेत, त्यासाठी सरकार आणि अन्य नागरी संस्थांना अनेक संसाधनांची आवश्यकता भासत आहे. यासाठी लागणऱ्या निधीची व्यवस्था करण्यासाठी सरकारी तिजोरीवरचा वेतनभार थोडा कमी करणे सहाय्यकारी ठरू शकते.
ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाने ऐच्छिक वेतन कपात करुन याला हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीचे ऐच्छिक योगदान म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, तसेच अशोक लवासा आणि अशोक चंद्रा हे निवडणूक आयुक्त, या तिघांच्याही वेतनात मूळ वेतनाच्या तीस टक्के कपात 1 एप्रिल 2020 पासून एक वर्षभर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे
B.Gokhale/V.Sahajrao/D.Rane
(Release ID: 1613894)
Visitor Counter : 220
Read this release in:
English
,
Urdu
,
Marathi
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam