PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


कोविड 19 च्या रुग्णांसाठी विविध वर्गवारीत तीन प्रकारच्या उपचार सुविधा निर्माण करणार: आरोग्य मंत्रालय

क्लस्टर कंटेनमेंट धोरणाचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेत: आरोग्य मंत्रालय

Posted On: 07 APR 2020 6:39PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours and Fact checks undertaken by PIB)

नवी दिल्ली-मुंबई, 7 एप्रिल 2020

 

जागतिक आरोग्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढीलप्रमाणे संदेश दिला. “आज जागतिक आरोग्य दिनी आपण एकमेकांच्या उत्तम आरोग्य आणि निरामय जीवनासाठी केवळ प्रार्थना करायची नाही तर कोविड-19 संकटाविरोधातील लढ्याचे निर्भयपणे नेतृत्व करणारे सर्व डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांप्रति पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करूया”.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुकारलेला 3 आठवड्यांचा देशव्यापी लॉकडाऊन जेव्हा 14 एप्रिलला संपेल, तेव्हा अर्थव्यवस्थेला स्थिरता प्रदान करण्याच्या कार्यापेक्षा लोकांच्या आरोग्याच्या मुद्यांकडे प्राधान्यक्रमाने लक्ष द्यावे, असे आवाहनउपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनीकेले आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवर पत्रकार परिषद 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री.लव अगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.

  • आतापर्यंत देशात कोविड-19च्या रुग्णांची संख्या- 4,421; एकूण मृत्यूसंख्या-117. गेल्या 24 तासांत: 354 नवे रुग्ण; तर 8 जणांचा  मृत्यू झाल्याची नोंद.326 जण उपचारानंतर कोरोनामुक्त

· सरकार क्लस्टर कंटेनमेंट म्हणजे संक्रमित रुग्णाचा रहिवासी भाग सील करण्यासाठी धोरण राबवत आहे.आम्हाला सांगायला समाधान वाटत आहे की, या धोरणाचे सकारात्मक परिणाम विशेषतः आग्रा, गौतमबुद्ध नगर, पथानमतिट्टा, भिलवाडा आणि पूर्व दिल्ली येथे दिसत आहेत. मुंबई आणि इतर जिल्ह्यातही कंटेंनमेंट धोरण आणि कृती आराखड्यानुसार कारवाई केली जात आहे

· कोविड-19चा सामना करण्यासाठी पुणे, सुरत, बेंगरुळू नि तुमकूरु सारखी स्मार्ट शहरेतंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.ज्यात टेहळणी, संपर्क आलेल्यांचा शोध, गृह विलगीकरण व्यवस्थापन, माहितीचा प्रसार, प्रशिक्षण, हिट मॅप्सचा वापर करुन विश्लेषण आणि समुपदेशन सामील आहे.

· आज आरोग्य मंत्रालयाने एक अत्यंत महत्वाचे निवेदन जारी केले आहे. कोविड-19चे रुग्ण आणि संशयित रुग्ण यांच्या व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शन करणारे हे निवेदन आहे. 

· या मार्गदर्शक निवेदनात कोविड 19च्या रुग्णांसाठी विविध वर्गवारीत तीन प्रकारच्या उपचार सुविधांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

  1. कोविड केअर सेंटर्स मध्ये केवळ सौम्यलक्षणे असलेल्या किंवा संशयित रुग्णांना ठेवून त्यांची काळजी घेतली जाईल.कोविड केअर सेंटर्स ही तात्पुरत्या स्वरूपाची सुविधा केंद्र असतील किंवा मग सरकारी/ खाजगी सुविधा, जसे की वसतिगृहे/ शाळा/ हॉटेल्स इत्यादी; विलगीकरण कक्ष देखील कोविड केअर सेंटर्स मध्ये रूपांतरित केले जाऊ शकतील. (आम्ही सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत की प्रत्येक कोविड सेंटर, कोविड केअर हॉस्पिटल आणि कोविड केअर आरोग्य केंद्र यांची एकमेकांशी सांगड घालावी, जेणेकरुन, कोणता रुग्ण कुठे भरती करायचा याविषयी स्पष्टता राहील.)
  2. दुसऱ्या पातळीवरील सुविधा 'कोविड आरोग्य केंद्र'ही आहे. ज्या अंतर्गत, ज्या रुग्णांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे असल्याची वैद्यकीयदृष्ट्या शिफारस केली गेलेली आहे, त्यांच्यावरउपचार होतील. ही केंद्रे रुग्णालये असू शकतात किंवा मग रुग्णालयांमधला समर्पित वार्ड ज्यात संक्रमण पसरणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली असेल.कोविड आरोग्य केंद्रातील खाटांसोबत खात्रीशीर ऑक्सिजनचा पुरवठा असेल.
  3. तिसऱ्या सुविधेअंतर्गत, कोविड समर्पित रुग्णालये असतील, ज्यात कोविडच्या गंभीर रुग्णांची संपूर्ण काळजी आणि उपचार केले जातील.समर्पित कोविड रुग्णालये ही संपूर्ण रुग्णालये किंवा एखाद्या रुग्णालयातील वॉर्ड असू शकेल, जिथे सर्व सुविधायुक्त अतिदक्षता विभाग, जीवरक्षक प्रणाली आणि ऑक्सिजन पुरवठा असलेले बेड असतील

· गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजन अत्यंत महत्वाचे असल्याबद्दल कळवले असून, या ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.

· भारतीय रेल्वेने आपल्या 2,500 डब्यांचे रूपांतर 40,000 विलगीकरण कक्षात केले आहे. दररोज 375 डब्यांचे विलगीकरण कक्षात रूपांतर करण्याचे लक्ष्य असून, हे काम देशभरातल्या 133 ठिकाणी सुरु आहे

· आयुष मंत्रालयाने स्वयं काळजी विषयक मार्गदर्शक तत्वे जारी केली असून, त्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि विशेषतः श्वसनरोगांविरुद्धची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावरचे उपाय सांगितले आहेत

· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली.कोविड19च्या या लढाईत कायम दक्ष, निग्रही आणि कृतसंकल्प राहण्यावर भर दिला आहे.

· मंत्रिमंडळासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये पंतप्रधान म्हणाले की, सर्व मंत्र्यांनी राज्ये आणि जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात राहून जिल्हास्तरीय सूक्ष्म कृती आराखडे तयार करावेत

· PM गरीब कल्याण योजनेचे लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहचतील, याची खात्री करावी, यावर पंतप्रधानांनी भर दिला.ॲप ग्रामीण भागात लोकप्रिय केले जावे; तसेच बिझनेस कम्युनिटी योजना तयार  करण्याचे त्यांनी आवाहन केले. 

· देशातल्या सर्व बाजारपेठांना शेतकऱ्यांशी जोडण्यासाठी काही अभिनव उपक्रम राबवावेत, जे कीॲप आधारित कॅब सेवेच्या धर्तीवर शेतमाल वहनासाठी 'ट्रक ऍग्रीगेटर्स'योजना राबवावी, असेही पंतप्रधान म्हणाले.

· आयसीएमआर, दिल्लीने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, एक कोरोनासंक्रमित व्यक्ती किती लोकांपर्यंत संक्रमण पोहचवू शकते, याचे अध्ययन केले असता- हे प्रमाण - 1.5 ते 4 इतके आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या अध्ययनानुसार, R0 जर 2.5 इतका गृहीत धरला तर, कुठलाही लॉकडाऊन नसताना किंवा सामाजिक अंतराचे नियम पाळले नाहीत तर, एक व्यक्ती 30 दिवसात 406 लोकांपर्यंत संसर्ग पोचवू शकते. दुसऱ्या बाजूने, जर, सामाजिक संपर्क टाळले तर, हाच धोका 75 टक्क्यांनी कमी होतो, म्हणजेच ही संक्रमित व्यक्ती केवळ 2.5 लोकांना संसर्ग देऊ शकते.म्हणूनच, सर्व जनतेला सामाजिकअंतराचे नियम पाळण्याची कळकळीची विनंती आहे; कोविड-19च्या व्यवस्थापनात हीच 'सामाजिक लस' आहे.

· कोविड-19चा सामना करण्यासाठी राज्ये सक्रिय पावले उचलत आहेत. बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या चाचण्या वाढवण्यात आल्या असून लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

· लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य आवश्यक आहे. आगामी काळात येणारे सणवार आणि उत्सव बघता,सामुदायिक नेत्यांनी जनतेला लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

· केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील सर्व जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचा आढावा घेतला, या वस्तूंचा काळाबाजार अथवा साठेबाजी करणाऱयांवर कठोर कारवाई आणि चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहक व्यवहार विभागही याकडे  बारकाईने लक्ष ठेवून आहे.

· सरकार औषधनिर्मितीशी संबंधित वस्तूंवरही देखरेख ठेवून आहे; औषधे आणि वैद्यकीय साधनांची ट्रकमार्फत वाहतूक आता जवळपास सुरळीत झाली आहे.

· लाईफलाईन उडान या उपक्रमा अंतर्गत 6 एप्रिल 2020 पर्यंत 152 विमानांमधून 200 टन पेक्षा जास्त वैद्यकीय वस्तूंची देशाच्या विविध भागात हवाई मालवाहतूक करण्यात आली आहे.

· जीवनावश्यक मालाची वाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वेने 6 एप्रिल पर्यंत 8,897 रेक्स/4,57,296 वागन्स रवाना केल्या आहेत

· आतापर्यंत कोविड संशयित रुग्णांच्या 1.07 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत.11,795 चाचण्या काल करण्यात आल्या, त्यापैकी 2,530 चाचण्या खाजगी लॅब्स मध्ये करण्यात आल्या. 136 सरकारी प्रयोगशाळा यासाठी कार्यरत असून, 59 खाजगी रुग्णालयात चाचण्यांसाठी मान्यता देण्यात आली आहे.

· जेव्हाही कुठला निर्णय घेतला जाईल, तेव्हा त्याची माहिती दिली जाईल, मात्र जोपर्यंत कुठल्याही निर्णयाची अधिकृत माहिती दिली जात नाही, तोपर्यंत शक्यता आणि तर्कवितर्कांवर विश्वास ठेवू नका - देशव्यापी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत सोशल मीडियावर येत असलेल्या मेसेजबाबत केलेल्या विचारणेवर आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

· हायड्रोक्सी क्लोरोक्वीनच्या आवश्यकतेबाबत आरोग्य मंत्रालयाने औषधनिर्माण मंत्रालयाशी पूर्ण समन्वय राखला असून, ,मागणी-पुरवण्याचे संतुलन साधले जात आहे. सध्या आपल्याकडे आवश्यक तेवढा साठा उपलब्ध आहे.

 

@PIBMumbai चे प्रेस कॉन्फरन्सचे लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Other updates:

 

महाराष्ट्रातील अपडेट्स

महाराष्ट्र पोलिसांनी पालघर जिल्ह्यात रसायन कारखान्यावर छापा मारून परवानगी शिवाय बनवण्यात येत असलेले हँड सॅनिटायझरआणि कच्चा माल ताब्यात घेतला

 

 

  https://pbs.twimg.com/profile_banners/231033118/1584354869/1500x500

***

DJM/RT/MC/SP/DR



(Release ID: 1612060) Visitor Counter : 441