• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

एकूण 4.33 कोटी चाचण्यांपैकी गेल्या दोन आठवड्यांत भारताने 1.22 कोटी पेक्षा जास्त चाचण्या केल्या


गेल्या 24 तासात दहा लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या

22 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा टीपीएम राष्ट्रीय सरासरीपेक्षा उत्तम

Posted On: 01 SEP 2020 7:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर,2020 

 

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून आक्रमक चाचण्या हे 'टेस्ट, ट्रॅक , ट्रीट' या केंद्रप्रणित धोरणातील मार्गदर्शक तत्त्व आहे. उच्च स्तरावरील सातत्यपूर्ण  तपासणीमुळे लवकर निदान होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते. 

या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने भारताच्या एकत्रित चाचण्यांच्या संख्येने आज 4.3 कोटींचा  (4,33,24,834) टप्पा पार केला आहे. गेल्या दोन आठवड्यात तब्बल 1,22,66,514 चाचण्या घेण्यात आल्या.

राज्ये / केंद्रशासित प्रदेश त्यांची चाचणी क्षमता वाढवत आहेत. एकूण चाचण्यांमध्ये जास्तीत जास्त योगदान देणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे. एकूण चाचण्यांपैकी सुमारे  34% चाचण्या या तीन राज्यांनी केल्या आहेत. भारताच्या प्रतिदिन  चाचणी क्षमतेने 10 लाख चाचण्याचा टप्पा  पार केला आहे.  गेल्या 24 तासांत 10,16,920 चाचण्या घेण्यात आल्या.

WhatsApp Image 2020-09-01 at 12.38.15 PM.jpeg

सरासरी साप्ताहिक चाचण्यांच्या संख्येमध्ये निरंतर वाढ झाली आहे. जुलै 2020 च्या पहिल्या आठवड्यापासून साप्ताहिक सरासरी चाचण्यामध्ये  4 पटीने वाढ झाली आहे.

विस्तारित नैदानिक प्रयोगशाळा नेटवर्क आणि देशभरात सुलभ चाचणीच्या सुविधांमुळे मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. प्रति दहा लाख लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण  (टीपीएम) लक्षणीयरीत्या वाढून  31,394 इतके झाले आहे. 

WhatsApp Image 2020-09-01 at 10.53.34 AM.jpeg

22 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा टीपीएम राष्ट्रीय सरासरीपेक्षा उत्तम  आहे. गोवा, दिल्ली, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू  एका दिवसात सर्वाधिक चाचण्या नोंदवत आहेत.

WhatsApp Image 2020-09-01 at 12.12.13 PM.jpeg

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि  @MoHFW_INDIA.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in

कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.

https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf 

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1650440) Visitor Counter : 160


Link mygov.in