• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय

कोविड-19 परिस्थितीतसुध्दा अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे(एमओएफपीआय) 581तक्रारींचे निवारण

Posted On: 30 MAY 2020 5:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2020

अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या तक्रार कक्षाकडे  प्राप्त 585 समस्यांपैकी 581 तक्रारींचे  निवारण कोविड-19  लॉकडाउन काळात  करण्यात आले. हे कृतीदल या तक्रारी संबंधित राज्य सरकार, अर्थमंत्रालय, गृहमंत्रालय अशा  प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे मांडत आहे. उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या सहयोगी कंपन्यांकडे आणि अन्न प्रक्रिया करणाऱ्या राज्यभरातील उद्योगांना अन्न प्रक्रियेत आणि संबंधित व्यवसायात उत्तम दर्जा आणि अधिकाधिक क्षमतेचे उत्पादन देताना काही समस्या नाहीत ना, यासाठी हे कृतीदल  सातत्याने संपर्कात आहे. देशभरात कोविड-19 दरम्यान उत्पादन प्रक्रिया किंवा अन्न पुरवठा साखळी क्षेत्रातील तक्रारी किंवा कोणत्याही समस्या उद्‌भवल्यास covidgrievance-mofpi@gov.in या मेलवर पाठविता येतील.

मंत्रालयात एक समर्पित कृतीदल तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि इन्व्हेस्ट इंडियाच्या सभासदांचा समावेश आहे. उद्योग तक्रार कक्षात थेट वैयक्तिकरित्या किंवा विविध उद्योग संघटनांद्वारे पोहोचता येईल. तक्रार निवारण कक्षाकडे आलेल्या एकूण तक्रारींपैकी महत्त्वाच्या तक्रारींमध्ये पुढील मुद्यांचा समावेश आहे.

  1. टाळेबंदीमुळे उद्योग बंद असणे
  2. रसद पुरवठा संबंधित समस्या, गोदाम बंद असणे
  3. कामगार उपलब्ध नसणे
  4. कर्मचारी आणि कामगारांचे स्थलांतर

केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्री  श्रीमती हरसिमरत कौर बादल यांनी तळागाळातील स्तरापर्यंत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नियमितपणे उद्योग क्षेत्रातील संघटना, कोल्ड चेन डेव्हलपर्स, निर्यातदार आदींशी सातत्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे.

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान कोल्ड चेन प्रमोटर्सशी संवाद साधताना मंत्रालयाने अनेक विविध समस्या नोंदविल्या आहेत, ज्यावर कृतीदल प्राधान्याने काम करीत आहे आणि संबंधिक भागधारकांकडे या समस्या नेण्यात आल्या आहेत. अन्न आणि त्यासंबंधित उद्योगांच्या आवश्यक गोष्टी लक्षात ठेवून आणि सामान्य गोष्टींची पूर्तता करण्यासाठी विविध पावले उचलली गेली आहेत.

एमओएफपीआय हे रसद आणि पुरवठा सशक्तीकरण समितीचे सदस्य देखील आहेत, आणि शिवाय पीक घेतलेल्या शेतीच्या उत्पादनांचा पुरवठा उद्योगांना होऊ शकेल जेणे  करून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल यासाठी प्रयत्नशील आहे. कोविड-19 च्या समस्येमुळे अन्न प्रक्रिया उद्योगावर कमी प्रमाणात परिणाम झाला आहे हे सुनिश्चित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने अनेक उपाययोजना केल्या आहेत.

 

B.Gokhale/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1627919) Visitor Counter : 45