अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
हरसिमरत कौर बादल यांचा शीतगृह शृंखला प्रकल्पाच्या प्रवर्तकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभाग
Posted On:
04 MAY 2020 8:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2020
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज महाराष्ट्र राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे समर्थित पूर्ण एकीकृत शीतगृह शृंखला प्रकल्पांच्या प्रवर्तकांसह व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेतला. एफपीआय राज्यमंत्री रामेश्वर तेली देखील या बैठकीला उपस्थित होते.
या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये 38 शीतगृह शृंखला प्रकल्पांचे प्रवर्तक सहभागी झाले होते. प्रवर्तकांनी यावेळी केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्र्यांशी संवाद साधताना प्रकल्प पूर्ण करतांना येणारे अनुभव/समस्यांची माहिती दिली. तसेच, लॉकडाऊन दरम्यान शीतगृह शृंखला प्रकल्प चालवताना येणाऱ्या आव्हानांची माहिती देखील मंत्र्यांना दिली.
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अन्नधान्य उत्पादनाची सध्याची पुरवठा साखळी अविरत सुरु ठेवण्याच्या आव्हानाला यशस्वीरीत्या सामोरे जाण्यासाठी एकीकृत शीतगृह शृंखला नेटवर्कच्या एकत्रित सामर्थ्याचा फायदा घेण्याच्या आवश्यकतेवर हरसिमरत कौर यांनी यावेळी जोर दिला.
त्यांनी यावेळी, लॉकडाऊनमुळे आणि त्याव्यतिरिक्त निर्यातीमधील अडचणीमुळे गोठवलेल्या भाज्या तसेच उपहारगृह, मेजवानीगृह, हॉटेल यासारखी पारंपारिक बाजारपेठ बंद असल्यामुळे प्रक्रियाकृत दुग्धजन्य पदार्थांचा साठा या विषयावर चर्चा केली.
एक तृतीयांश किंवा पन्नास टक्के कामगारांसह व्यवसाय सुरु केल्यामुळे कामाचे तास वाढल्याची माहिती यावेळी प्रवर्तकांनी दिली. यामुळे स्पर्धात्मक दृष्ट्या उत्पादनाचा दर्जा कमी झाला असून उत्पादन खर्च वाढला आहे.
केंद्रीय एफपीआय मंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये खालील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली:
- कच्च्या मालाची उपलब्धता आणि त्याची वाढती किंमत
- लॉकडाऊनचे कार्यान्वयावर परिणाम
- कामगार आणि लॉजिस्टिक समस्या
- उच्च वस्तुसुची खर्च
- शेतकऱ्यांना मोबदला द्यावा लागत असल्याने रोकडसुलभतेचे (तरलता) संकट
* * *
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
(Release ID: 1621035)
Visitor Counter : 184