नौवहन मंत्रालय
नौवहन मंत्रालयाचे नवे संकेतस्थळ - shipmin.gov.in
Posted On:
30 APR 2020 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2020
नौवहन मंत्रालयाने आपले संकेतस्थळ shipmin.gov.in अद्ययावत करून 30 एप्रिल 2020 रोजी त्याचा प्रारंभ केला आहे.
नवे संकेतस्थळ ओपन सोर्स टेक्नोलॉजीवर आधारित आहे. भारत सरकारच्या संकेतस्थळांसाठी, भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि तक्रारनिवारण विभागाने जारी केलेल्या, मार्गदर्शक सूचनांनुरूप हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.
नव्या संकेतस्थळाचे होमपेज आकर्षक असून सोशल मीडियाला ठळक स्थान देण्यात आले आहे. व्हिडिओ अपलोडिंगची अधिक चांगली सुविधा हे या संकेतस्थळाचे नवे वैशिष्ठ्य आहे.
M.Jaitly/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
(Release ID: 1619616)
Visitor Counter : 146