पंतप्रधान कार्यालय
यूकेच्या परराष्ट्र सचिवांनी घेतली पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
04 JUN 2026 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2026
यूकेचे परराष्ट्र सचिव इव्हेट कूपर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आणि अलिकडच्या काळात भारत-यूके भागीदारी अधिक दृढ झाल्याबद्दल कौतुक केले. यामुळे उभय देशांसाठी विकासाच्या अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत.
पंतप्रधानांनी पुष्टी केली की, ‘भारत-यूके व्हिजन 2035’ भागीदारीला मार्गदर्शन करत राहील आणि जागतिक हितासाठी संयुक्त प्रयत्न अधिक बळकट करेल.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट केले:
यूकेचे परराष्ट्र सचिव इव्हेट कूपर यांना भेटून आनंद झाला. अलिकडच्या काळात भारत-यूके भागीदारी अधिक दृढ झाल्याबद्दल कौतुक केले, ज्यामुळे आपल्या दोन्ही देशांसाठी विकासाच्या अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत.
भारत-यूके व्हिजन 2035 आपल्या भागीदारीला मार्गदर्शन करत राहील आणि जागतिक हितासाठीचे आपले संयुक्त प्रयत्न अधिक बळकट करेल. @YvetteCooperMP"
* * *
सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2269131)
आगंतुक पटल : 11