गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगाल,ओडिशा आणि आसामच्या लोकांना डोल जत्रा आणि डोला पौर्णिमेच्या दिल्या शुभेच्छा
भक्ती आणि रंगांचा हा सण सर्वांचे जीवन उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धीने परिपूर्ण करो
भगवान कृष्णाशी आनंदी मिलनाचा हा सण सर्वांसाठी सुख आणि सौभाग्य घेऊन येवो
या सणाची भव्यता आपल्या मुळांशी, संस्कृतीशी आणि वारशाशी असलेले आपले नाते आणखी दृढ करो
प्रविष्टि तिथि:
03 MAR 2026 1:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2026
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसामच्या लोकांना डोल जत्रा आणि डोला पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
अमित शाह यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे,"डोल जत्रानिमित्त पश्चिम बंगालमधल्या माझ्या बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा. या सणाची भव्यता आपल्या मुळांशी, संस्कृतीशी आणि वारशाशी असलेले आपले नाते आणखी दृढ करो तसेच सर्वांच्या जीवनात सुख आणि समृद्धी घेऊन येवो."
केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले आहे,"डोल पौर्णिमेनिमित्त ओडिशातल्या लोकांना हार्दिक शुभेच्छा. भगवान कृष्णासोबत आनंदमय मिलनाचा हा सण सर्वांसाठी सुख आणि सौभाग्य घेऊन येवो."
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे,"डोल जत्राच्या पवित्र सणानिमित्त आसामच्या माझ्या बंधू आणि शुभेच्छा.भक्ती आणि आणि रंगांचा हा सण सर्वांचे जीवन उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धीने परिपूर्ण करो."
अंबादास यादव/सोनाली कुलकर्णी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2234960)
आगंतुक पटल : 68
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam