गृह मंत्रालय
एलएव्हीम3-एम6 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी इस्रोच्या पथकाचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
24 DEC 2025 2:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2025
एलएव्हीम3-एम6 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी इस्रोच्या पथकाचे अभिनंदन केले आहे, ते म्हणाले की, यातून भारताच्या अवकाश क्षेत्रातील कौशल्याला व्यावसायिक यशात परिवर्तीत करण्याचे आपल्या वैज्ञानिकांचे सामर्थ्य दिसून येत आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “एलएव्हीम3-एम6 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या पथकाचे खूप खूप अभिनंदन. जगभरात सुधारित संपर्क यंत्रणा पुरवण्यासाठी आज प्रक्षेपित झालेल्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 या अमेरिकेच्या अवकाशयानाने भारताच्या अवकाश क्षेत्रातील कौशल्याला व्यावसायिक यशात परिवर्तीत करण्याचे आपल्या वैज्ञानिकांचे सामर्थ्य दाखवून दिले आहे. भारताला अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक गंतव्यस्थान बनवण्याचे मोदीजींचे स्वप्न याद्वारे साकार होत आहे.
* * *
नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208086)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu