गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना इथिओपियाचा सर्वोच्च पुरस्कार 'ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया' मिळाल्याबद्दल अभिनंदन केले
प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण
एखाद्या परदेशी राष्ट्राकडून मोदीजींच्या मुत्सद्देगिरीला मिळालेला हा 28वा सन्मान, जो त्यांच्या नेतृत्वाखाली जागतिक मुत्सद्देगिरीमध्ये भारताची वाढती प्रतिष्ठा दर्शवतो
हा सन्मान भारत आणि इथिओपिया यांच्या मैत्रीतील एक महत्त्वाचा टप्पा
प्रविष्टि तिथि:
17 DEC 2025 11:01AM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना इथिओपियाने आपला सर्वोच्च पुरस्कार, 'ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया' प्रदान केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे शहा यांनी म्हटले आहे.
'एक्स' (X) वरील संदेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले,
“प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांना इथिओपियाने आपला सर्वोच्च पुरस्कार, 'ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया' प्रदान केल्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन. एखाद्या परदेशी राष्ट्राकडून मोदीजींच्या मुत्सद्देगिरीला मिळालेला हा 28वा सन्मान आहे, जो त्यांच्या नेतृत्वाखाली जागतिक मुत्सद्देगिरीमध्ये भारताची वाढती प्रतिष्ठा दर्शवतो. हा सन्मान भारत आणि इथिओपिया यांच्या मैत्रीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.”
***
NitinFulluke/ShraddhaMukhedkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2205028)
आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam