|
अनु. क्र.
|
सामंजस्य करार / करारनामे / कृती आराखड्याचे नाव
|
तपशील
|
भूतानच्या बाजूचे प्रतिनिधी
|
भारताच्या बाजूचे प्रतिनिधी
|
|
1
|
भारताकडून भूतानला पेट्रोलियम, तेल, वंगण आणि संबंधित उत्पादनांच्या पुरवठ्याबाबत सामंजस्य करार
|
या करारानुसार पेट्रोलियम, तेल आणि स्नेहक या संबंधित वस्तूंची यादी निश्चित करण्यात आली असून, भारत सरकार मान्य केलेल्या प्रवेश/निर्गमन बिंदूंमधून त्यांचा पुरवठा सुलभ करेल.
|
ताशी वांगमो, सचिव, उद्योग, वाणिज्य व रोजगार मंत्रालय, भूतान सरकार
|
सुधाकर दलेला, भारताचे भूतानमधील राजदूत
|
|
2
|
अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) द्वारे भूतान अन्न आणि औषध प्राधिकरणाने (BFDA) वापरलेल्या अधिकृत नियंत्रणाला मान्यता देण्याबाबतचा करार
|
या करारामुळे भारत-भूतान व्यापार अधिक सुलभ होईल आणि दोन्ही देशांसाठी अनुपालनखर्च कमी होईल. BFDA कडून जारी करण्यात आलेली निर्यात तपासणी प्रमाणपत्रे आता FSSAI मान्य करेल.
|
पेम्बा वांगचुक, सचिव, आरोग्य मंत्रालय, भूतान सरकार
|
सुधाकर दलेला, भारताचे भूतानमधील राजदूत
|
|
3
|
ऊर्जा कार्यक्षमता व ऊर्जा बचत उपायांबाबत सहकार्य करार
|
या करारान्वये भारत भूतानला घरगुती क्षेत्रातील ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी स्टार लेबलिंग कार्यक्रम राबविण्यात मदत करेल. तसेच भारताच्या अनुभवावर आधारित बांधकाम संहितांची निर्मिती आणि ऊर्जा लेखापरीक्षकांचे प्रशिक्षण संस्थात्मक स्वरूपात देण्यात येईल.
|
कर्मा त्शेरिंग, सचिव, आर्थिक आणि नैसर्गिक साधन मंत्रालय, भूतान सरकार
|
सुधाकर दलेला, भारताचे भूतानमधील राजदूत
|
|
4
|
क्रीडा व युवक क्षेत्रातील सहकार्य करार
|
या करारामुळे भारत व भूतान यांच्या नागरिकांमधले संबंध अधिक मजबूत होतील. दोन्ही देशांच्या क्रीडा संस्थांदरम्यान सहकार्य वाढविणे व संयुक्त क्रीडा कार्यक्रम आयोजित करणे हे उद्दिष्ट आहे.
|
पेम चोडेन, सचिव, परराष्ट्र आणि परकीय व्यापार मंत्रालय, भूतान सरकार
|
सुधाकर दलेला, भारताचे भूतानमधील राजदूत
|
|
5
|
औषधांच्या संदर्भ मानक, औषधकोश, सतर्कता व चाचणी याबाबत सहकार्य करार
|
या करारामुळे दोन्ही देशांतील औषध नियंत्रण क्षेत्रातील माहिती व सहकार्य अधिक वाढेल. तसेच भूतानने भारतीय औषधकोशाला मानक ग्रंथ म्हणून स्वीकारण्यास सहमती दिली असून, स्वस्त दरात जनरिक औषधे पुरवली जातील.
|
पेम्बा वांगचुक, सचिव, आरोग्य मंत्रालय, भूतान सरकार
|
सुधाकर दलेला, भारताचे भूतानमधील राजदूत
|
|
6
|
अवकाश क्षेत्रातील सहकार्याबाबत संयुक्त कृती आराखडा
|
या कृती आराखड्यात प्रशिक्षण व देवाणघेवाण कार्यक्रमांद्वारे भारत-भूतान अवकाश सहकार्य पुढे नेण्यासाठी ठोस मार्गदर्शक योजना निश्चित करण्यात आली आहे.
|
जिग्मे तेनझिंग, सचिव, सरकारी तंत्रज्ञान संस्था, भूतान सरकार
|
सुधाकर दलेला, भारताचे भूतानमधील राजदूत
|
|
7
|
भारताच्या नॅशनल नॉलेज नेटवर्क (NKN) आणि भूतानच्या ड्रुक रिसर्च अँड एज्युकेशन नेटवर्क (DrukREN) यांच्यातील 'पिअरिंग व्यवस्थापन' कराराचे नूतनीकरण
|
या करारामुळे भारत आणि भूतान दरम्यान डिजिटल संपर्क अधिक बळकट होईल. संशोधक आणि शैक्षणिक संस्थांना याचा थेट लाभ मिळेल.
|
जिग्मे तेनझिंग, सचिव, सरकारी तंत्रज्ञान संस्था, भूतान सरकार
|
सुधाकर दलेला, भारताचे भूतानमधील राजदूत
|