पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        पंतप्रधानांनी भारताच्या सागरी पुनर्जागरणाची कल्पना सामायिक केली, जागतिक गुंतवणूक आमंत्रित केली
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                30 OCT 2025 5:02PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2025
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी आघाडीचे ठिकाण म्हणून भारत उदयास येत आहे याबद्दल आपले विचार मांडले आहेत. सागरी क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या बाबतीत भारत हे एक परिपूर्ण ठिकाण  आहे यावर त्यांनी भर दिला. आमच्याकडे खूप लांब किनारपट्टी आहे. आमच्याकडे जागतिक दर्जाची बंदरे आहेत. आमच्याकडे पायाभूत सुविधा, नवोन्मेष आणि उद्देश आहे. या , भारतात गुंतवणूक करा, असे मोदी म्हणाले.
आपल्या  लिंक्डइन पेजवरील सविस्तर पोस्टमध्ये, पंतप्रधानांनी भारताचे सर्वच दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचे स्थान, आधुनिक बंदर संबंधी पायाभूत सुविधा आणि नाविन्यपूर्ण संशोधनाप्रति वचनबद्धता यामुळे जहाज बांधणी, बंदर कामकाज , लॉजिस्टिक्स, किनारी नौवहन आणि संबंधित सेवांमध्ये गुंतवणूकदारांसाठी प्रचंड संधी कशा खुल्या होत आहेत याची माहिती दिली.
ते म्हणाले की, 7,500 किमी पेक्षा जास्त लांबीची किनारपट्टी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बंदरांचे विस्तारित जाळे यामुळे, भारत एक प्रमुख सागरी केंद्र बनण्यास सज्ज असून केवळ कनेक्टिव्हिटीच नाही तर मूल्यवर्धित सेवा, हरित शिपिंग उपक्रम आणि उद्योग-स्नेही  धोरणात्मक चौकटी प्रदान करतो.
पंतप्रधानांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना "या, भारतात गुंतवणूक करा" आणि मजबूत पायाभूत सुविधा, स्पष्ट उद्देश  आणि उदयोन्मुख नवोन्मेष परिसंस्थेची जोड लाभलेल्या  देशाच्या सागरी विकासगाथेचा भाग बना असे आवाहन केले.
लिंक्डइनवर लिहिलेले आपले  विचार सामायिक करताना पंतप्रधानांनी X वर लिहिले;
"सागरी क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या बाबतीत भारत एक परिपूर्ण ठिकाण  आहे."
आमच्याकडे खूप लांब किनारपट्टी आहे.
आमच्याकडे जागतिक दर्जाची बंदरे आहेत.
आमच्याकडे पायाभूत सुविधा, नवोन्मेष आणि उद्देश आहे.
या, भारतात गुंतवणूक करा
@LinkedIn वर काही विचार सामायिक केले आहेत .”
 
 
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2184228)
                Visitor Counter : 9
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam