पंतप्रधान कार्यालय
पाली भाषेला 'अभिजात भाषेचा' दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे भगवान बुद्धांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये आनंदाची भावना निर्माण झाली आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2024 10:43AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2024
केंद्र सरकारने पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. यामुळे भगवान बुद्धांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये आनंदाची भावना निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोलंबो इथे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने आयोजित केलेल्या 'पाली एक अभिजात भाषा ' या विषयावरील निमंत्रितांच्या चर्चासत्रात सहभागी झालेल्या विविध देशांतील विद्वान आणि बौद्ध भिक्खूंचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.
यासंदर्भातकोलंबोतील भारतीय उच्चआयोगाचे अधिकृत हॅन्डल India in Sri Lanka ने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेल्या संदेशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला प्रतिसाद :
"केंद्र सरकारने पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे भगवान बुद्धांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये आनंदाची भावना निर्माण झाली आहे याचा मला आनंद वाटतो. कोलंबो इथल्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विविध देशांमधील विद्वान आणि भिक्खूंप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो."
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2184086)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam