पंतप्रधान कार्यालय
'मेक इन इंडिया'ला चालना, तसेच अतिशय वर्दळीच्या पूर्व-पश्चिम व्यापारी मार्गावरील बंदरे आधुनिक, यांत्रिकीकृत आणि अंकीकृत करण्याच्या प्रयत्नांमुळे देशाचा वाढता आणि लवचिक औद्योगिक आधार स्पष्ट करणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
23 OCT 2025 6:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा एक लेख सामायिक केला. या लेखात, मेक इन इंडिया ला दिलेल्या चालनेमुळे देशाचा औद्योगिक पाया कसा लवचिक आणि विकसित होत आहे, यासोबतच प्रचंड वर्दळ असलेल्या पूर्व - पश्चिम व्यापारी मार्गावरील बंदरांचे आधुनिकरण, यांत्रिकीकरण आणि डिजीटायझेशनच्या प्रयत्नांमुळे देशाला कसा मोठा लाभ मिळाला आहे याबाबतची मांडणी केली आहे.
या संदर्भातील केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या X या समाजमाध्यमावरील संदेशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला प्रतिसाद.
वाचलाच पाहिजे अशा या लेखात, मेक इन इंडियाला दिलेल्या चालनेमुळे विकसित होत असलेला वाढता आणि लवचिक औद्योगिक आधार, तसेच कायम वर्दळ असलेल्या पूर्व-पश्चिम व्यापारी मार्गावरील बंदराचे आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण आणि डिजीटायझेशनच्या प्रयत्नांमुळे देशाला कसा मोठा लाभ मिळाला आहे हे केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal यांनी, मांडले आहे.
भारताच्या जहाजबांधणी आणि सागरी परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकारने दिलेले 8 अब्ज रुपयांचे पॅकेज म्हणजे केवळ नियमित अर्थसंकल्पीय तरतूद नाही, तर ते महत्वाकांक्षेचे निर्देशक आहे ही बाबही त्यांनी अधोरेखित केली आहे.
शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2181916)
Visitor Counter : 4
Read this release in:
Manipuri
,
Telugu
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada