पंतप्रधान कार्यालय
"भारताच्या पाणथळ संवर्धन मोहिमेतील मैलाचा दगड" या शब्दात पंतप्रधानांनी बिहारमधील नव्या रामसर स्थळांचा केला गौरव
Posted On:
27 SEP 2025 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील दोन नव्या रामसर स्थळांचा समावेश ज्यात बक्सर जिल्ह्यातील गोकुळ जलाशय (448 हेक्टर) आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यातील उदयपूर झील (319 हेक्टर) यांचा समावेश होतो, याला भारताच्या पर्यावरणीय संवर्धनासाठी अभिमानाचा क्षण ठरवत गौरव केला.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले :
“अतिशय आनंदाची बातमी! शाश्वत विकासासाठी पाणथळ क्षेत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या आघाडीवर विचार आणि कृतीतून उदाहरण घालणाऱ्या बिहारच्या जनतेचे विशेष अभिनंदन.”
* * *
निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2172260)
Visitor Counter : 12