पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घेतली त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
Posted On:
04 JUL 2025 11:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्ट ऑफ स्पेन येथे राष्ट्रपती भवनात त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकच्या राष्ट्रपती क्रिस्टीन कार्ला कंगालू यांची भेट घेतली. या स्नेहपूर्ण आणि सौहार्दपूर्ण भेटीने दोन्ही देशांमधील घनिष्ठ मैत्री दृढ झाली आहे.
पंतप्रधानांनी आपले आणि शिष्टमंडळाचे उत्तमरित्या, आपुलकीने केलेल्या आदरातिथ्याबद्दल राष्ट्राध्यक्ष कंगालू यांचे मनापासून आभार मानले आणि ‘ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ प्रदान केल्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. हा भारतातील 1.4 अब्ज लोकांसाठी एक सन्मान असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
या वर्षीचा प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपती कंगालू यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या यशस्वी सार्वजनिक सेवेबद्दल त्यांचे मनापासून कौतुक केले. राष्ट्रपती कंगालू यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाविषयी आणि भारतासाठीच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली.
दोन्ही नेत्यांनी उभय देशांतील लोकांमधील मजबूत संबंधांवरही चर्चा केली.
ग्लोबल साऊथ मधील भागीदारी वाढवण्यासाठी त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच कॅरिकोम यांना भारताच्या निरंतर पाठिंब्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. पंतप्रधानांनी राष्ट्रपती कांगालू यांना भारताला भेट देण्यासाठी आमंत्रित केले.
* * *
सुवर्णा बेडेकर/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2169593)
Visitor Counter : 4
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam