पंतप्रधान कार्यालय
वस्तू आणि सेवा करातील अलीकडील सुधारणांमुळे अन्नप्रक्रिया क्षेत्राअंतर्गत व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत झालेल्या परिणामावर आधारित लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक
Posted On:
19 SEP 2025 12:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी लिहिलेला एक लेख आज समाज माध्यमावर सामायिक केला आहे. वस्तू आणि सेवा करातील अलीकडील सुधारणा म्हणजे केवळ तांत्रिक बदल नाहीत तर त्याद्वारे, जीवनमान सुलभता, व्यवसाय सुलभता आणि गुंतवणूक सुलभतेत वृद्धी करण्यासाठी कशा रितीने धाडसी पावले टाकली गेली आहेत याची मांडणी या लेखात केलेली आहे. दैनंदिन गरजेच्या खाद्यान्न उत्पादनांवर आणि पॅकेजिंगवरील कराचे दर कमी केल्यामुळे, किराणा सामान अधिक परवडणारे झाले आहे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळाली आहे, शेतकऱ्यांना मदत झाली आहे आणि जागतिक खाद्यान्न क्षेत्रात भारताची स्पर्धात्मकता वाढली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या X या समाज माध्यमावरील संदेशांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला प्रतिसाद :
वस्तू आणि सेवा करातील अलीकडील सुधारणा म्हणजे केवळ तांत्रिक बदल नाहीत तर त्याद्वारे, जीवनमान सुलभता, व्यवसायाय सुलभता आणि गुंतवणूक सुलभतेत वृद्धी करण्यासाठी टाकलेली धाडसी पावले आहेत असे केंद्रीय मंत्री @iChiragPaswan यांनी लिहिले आहे. दैनंदिन गरजेच्या खाद्यान्न उत्पादनांवर आणि पॅकेजिंगवरील कराचे दर कमी केल्यामुळे, किराणा सामान अधिक परवडणारे झाले आहे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळाली आहे, शेतकऱ्यांना मदत झाली आहे आणि जागतिक खाद्यान्नाच्या क्षेत्रात भारताची स्पर्धात्मकता वाढली आहे.
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168434)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam