पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

15 कोटींहून अधिक घरांना स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचवणाऱ्या जल जीवन मिशनची सहा वर्षे पंतप्रधानांकडून अधोरेखित

Posted On: 14 AUG 2025 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशनला आज सहा वर्षे पूर्ण झाल्याचे अधोरेखित केले. प्रत्येक कुटुंबात घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊन देशभरातील लाखो कुटुंबांमध्ये  परिवर्तन घडवून आणणारा हा एक प्रमुख उपक्रम आहे

2019 मध्ये सुरू झालेले जल जीवन मिशन हे अवघ्या काही वर्षांमध्ये 15 कोटींहून अधिक घरांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी पोहचवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा आधारस्तंभ ठरले आहे, ज्यामुळे आरोग्य सुधारले आहे, समुदायांना सक्षम बनवले  आहे आणि अगणित  स्वप्ने साकारली आहेत.

पंतप्रधानांनी भर देत नमूद केले की या योजनेने केवळ ग्रामीण भारतातील जीवनस्तर  उंचावला नाही तर आरोग्यसेवेचे परिणाम देखील लक्षणीयरीत्या मजबूत केले आहेत, विशेषतः महिलांना - भारताच्या नारी शक्तीला याचा लाभ झाला आहे.

MyGovIndia ने एक्सवर केलेल्या वेगवेगळ्या पोस्टना उत्तर देताना मोदी यांनी लिहिले:

"आपण  #6YearsOfJalJeevanMission साजरी करत आहोत , ही योजना प्रतिष्ठा आणि जीवनात परिवर्तन घडवून आणण्यावर केंद्रित आहे.  या योजनेमुळे विशेषतः आपल्या नारी शक्तीसाठी चांगली आरोग्यसेवा देखील सुनिश्चित झाली आहे, ."

"देशभरात जल जीवन मिशनच्या चिरस्थायी  परिणामाची एक झलक.

#6YearsOfJalJeevanMission"

 

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2156391)