पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनाच्या विशेष समारंभातील क्षणचित्रे केली सामायिक


नारी शक्तीच्या निरंतर विश्वास आणि प्रेमाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता

चिमुरड्या बालिकांनी पंतप्रधानांना बांधली राखी

प्रविष्टि तिथि: 09 AUG 2025 7:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 7, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली येथील निवासस्थानी मुलांसोबत साजऱ्या केलेल्या रक्षाबंधनाच्या खास समारंभातील क्षणचित्रे सामायिक केली आहेत. नारी शक्तीच्या निरंतर विश्वास आणि प्रेमाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

चिमुरड्या बालिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली आणि त्यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

X या समाज माध्यमावर लिहिलेल्या एका संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे ;

“आज सकाळी साजऱ्या केलेल्या एका अतिशय खास रक्षाबंधन समारंभातील क्षणचित्रे येथे सामायिक करत आहे. निरंतर विश्वास आणि प्रेमाबद्दल आपल्या नारी शक्तीचे आभार.”

 

* * *

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2154741) आगंतुक पटल : 38
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam