पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा: फलनिष्पत्ती

Posted On: 05 AUG 2025 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 ऑगस्‍ट 2025

 

अनु. क्र.

करार/सामंजस्य कराराचे नाव

1

भारत आणि फिलिपिन्स दरम्यान  धोरणात्मक भागीदारी स्थापन झाल्याची घोषणा

2

भारत आणि फिलिपिन्स  धोरणात्मक भागीदारी: कृती आराखडा  (2025-29)

3

भारतीय हवाई दल आणि फिलिपिन्स हवाई दल दरम्यान हवाई दल अधिकाऱ्यांच्या चर्चेसाठी  संदर्भ अट

4

भारतीय लष्कर आणि फिलिपिन्स लष्कर दरम्यान  लष्कर-ते-लष्कर अधिकाऱ्यांच्या चर्चेसाठी  संदर्भ अटी

5

भारतीय नौदल आणि फिलिपिन्स नौदल दरम्यान  नौदल-ते-नौदल चर्चेसाठी संदर्भ अटी

6

भारत सरकार आणि फिलिपिन्स सरकार दरम्यान गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहाय्याबाबत करार

7

भारत सरकार आणि फिलिपिन्स सरकार दरम्यान  शिक्षा सुनावलेल्या  दोषी व्यक्तींच्या हस्तांतरणाबाबत करार

8

भारताचा  विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि फिलिपिन्सचा  विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यांच्यात 2025-2028  या कालावधीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याचा कार्यक्रम

9

फिलिपिन्स सरकारचा पर्यटन विभाग आणि भारत  सरकारचे  पर्यटन मंत्रालय यांच्यात पर्यटन सहकार्याबाबत  अंमलबजावणी कार्यक्रम (2025-2028)

10

भारत  सरकार आणि फिलिपिन्स सरकार यांच्यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार.

11

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, भारत  आणि फिलिपिन्स अंतराळ संस्था, फिलिपिन्स यांच्यात बाह्य अवकाशाच्या शांततापूर्ण वापरावरील सहकार्याबाबत इरादा पत्र

12

भारतीय तटरक्षक दल आणि फिलिपिन्स तटरक्षक दल यांच्यात वाढीव सागरी सहकार्यासाठी संदर्भ अटी

13

भारत सरकार आणि फिलिपिन्स सरकार यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम

घोषणा:

1) फिलिपिन्सच्या सार्वभौम डेटा क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्थापनेसाठी पथदर्शी प्रकल्पाला  भारत सहाय्य करेल ;

2) माहिती फ्यूजन सेंटर - हिंद महासागर क्षेत्र  (IFC-IOR) मध्ये सहभागी होण्यासाठी फिलिपिन्सला आमंत्रण देण्यात आले;

3) फिलिपिन्सच्या  नागरिकांना एक वर्षाच्या कालावधीसाठी (ऑगस्ट 2025 पासून) मोफत ई-टूरिस्ट व्हिसा सुविधा प्रदान करण्यात आली;

4)  भारत-फिलिपिन्स राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्तपणे  टपाल तिकिट  जारी;

5) भारत आणि फिलिपिन्स यांच्यातील प्राधान्य व्यापार करारावरील वाटाघाटींसाठी संदर्भ अटींना मान्यता.

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2152811)