रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर मथुरा-कोटा विभागात स्वदेशी पद्धतीने विकसित कवच 4.0 ही प्रणाली कार्यान्वित


व्यस्त असलेल्या या विभागात विक्रमी वेळेत कवच 4.0 सुरू करणे ही रेल्वेची मोठी कामगिरी: अश्विनी वैष्णव

Posted On: 30 JUL 2025 8:59PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025

 

भारतीय रेल्वेने दिल्ली-मुंबई मार्गाच्या मथुरा-कोटा विभागात स्वदेशी रेल्वे सुरक्षा प्रणाली कवच 4.0 कार्यान्वित केली आहे. देशातील रेल्वे सुरक्षा प्रणालींच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन रेल्वेने कवच ही देशी बनावटीची रचना असलेली स्वयंचलित रेल्वेगाडी सुरक्षा प्रणाली विकसित केली आहे. कवच 4.0 ही एक तंत्रज्ञान-केंद्रित प्रणाली आहे. जुलै 2024 मध्ये रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) ने याला मान्यता दिली. अनेक विकसित राष्ट्रांना रेल्वेगाडी सुरक्षा प्रणाली विकसित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 20-30 वर्षे लागली.कोटा-मथुरा विभागात कवच 4.0 प्रणाली अल्पावधीत कार्यान्वित झाली आहे. ही खूप मोठी कामगिरी आहे.” असे वैष्णव म्हणाले.

स्वातंत्र्यानंतर गेल्या 60  वर्षांत देशात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रगत रेल्वे सुरक्षा प्रणाली बसवण्यात आल्या नव्हत्या. रेल्वे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, कवच प्रणाली अलीकडेच कार्यान्वित करण्यात आली आहे.

6 वर्षांच्या अल्पावधीत देशभरातील विविध मार्गांवर कवच 4.0 सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज होत आहे. 30,000 हून अधिक लोकांना कवच प्रणालीबद्दलचे प्रशिक्षण आधीच देण्यात आले आहे.

प्रभावीपणे ब्रेकचा वापर करून लोको पायलटना ट्रेनचा वेग राखण्यासाठी कवच प्रणाली मदत करते. या प्रणालीमुळे धुक्यासारख्या कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही, लोको पायलटना सिग्नल बघण्यासाठी केबिनमधून बाहेर पाहावे लागणार नाही. कॅबमध्ये बसवलेल्या डॅशबोर्डवर ते माहिती पाहू शकतात.

कवच म्हणजे काय?

  • कवच ही स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली रेल्वे सुरक्षा प्रणाली आहे. ती रेल्वेच्या वेगाची  देखरेख  आणि नियंत्रण करून अपघात रोखण्यासाठी आरेखित केली आहे.
  • ही सुरक्षा एकात्मता पातळी 4 (एस आय एल 4) वर आरेखित केली आहे. ही सुरक्षा आरेखनाची सर्वोच्च पातळी आहे.
  • कवचचा विकास 2015 मध्ये सुरू झाला. या प्रणालीची 3 वर्षांहून अधिक काळ विस्तृत प्रमाणावर चाचणी घेण्यात आली.
  • तांत्रिक सुधारणांनंतर, ही प्रणाली दक्षिण मध्य रेल्वे (एससीआर) मध्ये स्थापित करण्यात आली. 2018 मध्ये पहिले कार्यात्मक प्रमाणपत्र देण्यात आले.
  • एससीआरमध्ये मिळालेल्या अनुभवांच्या आधारे 'कवच 4.0' ही प्रगत आवृत्ती विकसित करण्यात आली. मे 2025 मध्ये 160 किमी प्रतितास वेगासाठी तिला मान्यता देण्यात आली.
  • कवचचे घटक स्वदेशी पद्धतीने तयार केले जात आहेत.

कवचची जटिलता

कवच ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रणाली आहे. कवच बसवून सुरू करणे हे टेलिकॉम कंपनी स्थापन करण्यासारखे आहे.

   

(Installation of RFID Tags on tracks)

टेलिकॉम टॉवर्स: ऑप्टिकल फायबर जोडणी आणि वीज पुरवठ्यासह पूर्णतः कार्यरत टेलिकॉम टॉवर्स रेल्वेमार्गाच्या दर काही किलोमीटर अंतरावर स्थापित केले जातात. इंजिनावर स्थापित कवच प्रणाली आणि स्थानकावरील कवच नियंत्रक यांच्यात या टॉवर्सचा वापर करून सतत संवाद साधला जातो.

  

(Telecom towers installed)

प्रवासी आणि मालगाड्यांची  मोठ्या प्रमाणात ये-जा असलेल्या रेल्वेच्या कामकाजात व्यत्यय न आणता या प्रणाली स्थापित करणे, तपासणे आणि प्रमाणित करणे आवश्यक असते.

(Installation of Loco Kavach)

(Installation of Station Kavach)

(Station Kavach)

(Station Manager’s Operation Panel)

कवच प्रगती

अनुक्रमांक

कार्य

प्रगती

1

ऑप्टिकल फायबर टाकणे

5,856  किमी

2

टेलिकॉम टॉवर उभारणे

619

3

स्थानकांवर कवच बसवणे

708

4

इंजिनांवर कवच बसवणे

1,107

5

ट्रॅकसाइड उपकरणे बसवणे

4,001 आरकेएम

 

भारतीय रेल्वे सुरक्षेशी संबंधित उपक्रमांवर दरवर्षी 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करते. प्रवाशांची आणि गाड्यांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांपैकी कवच ही एक आहे. यासंदर्भात झालेली प्रगती आणि कवचच्या तैनातीची गती यामुळे रेल्वे सुरक्षा सुनिश्चित करण्याची भारतीय रेल्वेची वचनबद्धता दिसून येते.

 

* * *

निलिमा चितळे/प्रज्ञा/नंदिनी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2150463)