पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जेष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांच्या निधनावर व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
14 JUL 2025 4:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान म्हणाले की, “त्या भारतीय चित्रपटसृष्टी आणि संस्कृतीच्या एक आदर्श प्रतीक म्हणून कायम सर्वांच्याच स्मरणात राहतील. त्यांच्या विविध भूमिकांनी अनेक पिढ्यांवर आपला ठसा उमटवला. वेगवेगळ्या भाषा आणि विषयांवरच्या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिकांमधून त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचे दर्शन होते.“
पंतप्रधानांनी एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे:
"जेष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्या भारतीय चित्रपटसृष्टी आणि संस्कृतीच्या एक आदर्श प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या विविध भूमिका अनेक पिढ्यांवर ठसा उमटवणाऱ्या ठरल्या. वेगवेगळ्या भाषा आणि विषयांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिकांमधून त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचे दर्शन होते. त्यांचे कुटुंबीय व प्रशंसकांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. ओम शांती."
* * *
S.Kakade/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2144557)
आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali-TR
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam