पंतप्रधान कार्यालय
नायजेरियाचे माजी राष्ट्रपती मुहम्मदू बुहारी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
14 JUL 2025 2:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे माजी राष्ट्रपती मुहम्मदू बुहारी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बुहारी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात विविध प्रसंगी झालेल्या भेटी आणि संवादांची यावेळी त्यांनी आठवण काढली. बुहारी यांचा विवेक, प्रेमळपणा आणि भारत-नायजेरिया मैत्रीप्रती त्यांची अढळ बांधिलकी सदैव स्मरणात राहील, असे मोदी म्हणाले. 140 कोटी भारतीयांच्या वतीने आपण त्यांचे कुटुंब, सरकार आणि नायजेरियाच्या जनतेप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो.
एक्स या सामाजिक माध्यमावरच्या शोकसंदेशात पंतप्रधान म्हणाले की,
"नायजेरियाचे माजी राष्ट्रपती मुहम्मदू बुहारी यांच्या निधनाने मी अत्यंत दुःखी झालो आहे. विविध प्रसंगी त्यांच्याशी झालेल्या माझ्या भेटी आणि संवाद यांची आठवण होत आहे, त्यांचा विवेक, प्रेमळपणा आणि भारत-नायजेरिया मैत्रीप्रती त्यांची अढळ बांधिलकी सदैव स्मरणात राहील. मी 140 कोटी भारतीयांच्या वतीने त्यांचे कुटुंब, सरकार आणि नायजेरियाच्या जनतेप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो."
@officialABAT
@NGRPresident”
* * *
JPS/R.Dalekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2144488)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam