पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सॅन मार्टिन स्मारकावर वाहिली आदरांजली
Posted On:
06 JUL 2025 12:52AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपिता, जनरल जोसे डी सॅन मार्टिन यांना आदरांजली अर्पण करून आपल्या अर्जेंटिनाच्या अधिकृत दौऱ्याची सुरुवात केली.
आपल्या अर्जेंटिना भेटीत पंतप्रधानांनी प्लाझा सॅन मार्टिनला भेट दिली व तिथल्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यांनी जनरल जोसे डी सॅन मार्टिन यांना आदरांजली वाहिली. अर्जेंटिना व इतर अनेक दक्षिण अमेरिकन राष्ट्रांचे मुक्तिदाता म्हणून त्यांच्या चिरस्थायी वारशाबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला. भारताने कायमच त्यांच्या योगदानाचा तसेच त्यांनी जपलेल्या मूल्यांचा सन्मान राखला आहे. त्यांच्या वारशाचे स्मरण म्हणून नवी दिल्लीतील एका रस्त्याला अर्जेंटिनाच्या या नायकाचे नाव देण्यात आले आहे. भारत व अर्जेंटिना हे दोन्ही देश परस्परांमधील सौहार्दपूर्ण तसेच मैत्रीपूर्ण संबंधांचे एक जाज्वल्य प्रतीक आहे.
***
S.Pophale/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2142652)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam