गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे देशातील पूर व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन
Posted On:
10 JUN 2025 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2025
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे देशातील पूर व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील पुराचा धोका कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा आणि गेल्या वर्षी झालेल्या बैठकीतील निर्णयांवर उचललेल्या पावलांचाही आढावा घेतला.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी बैठकीत पूर व्यवस्थापनासाठी सर्व संस्थांनी स्वीकारलेल्या नवीन तंत्रज्ञानावर आणि त्यांच्या जाळ्याच्या विस्तारावरही चर्चा केली. पूर नियंत्रण आणि जलव्यवस्थापनासाठी विविध केंद्रीय संस्थांनी अंतराळ तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे आपत्कालीन व्यवस्थापन 'शून्य जीवितहानी दृष्टीकोनासह' पुढे जात आहे, असे अमित शाह म्हणाले. त्यांनी राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) ला राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणे (SDMAs) आणि जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणे (DDMAs) यांच्याशी समन्वय साधून तळागाळापर्यंत पूर्वसूचना पोहोचवण्याचे निर्देश दिले. तसेच, त्यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पूर व्यवस्थापनासाठी एनडीएमए द्वारे जारी केलेल्या सूचनांची वेळेवर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. त्यांनी एनडीएमए आणि एनडीआरएफला राज्यांसोबत पूर्ण समन्वयाने कार्यक्षम पूर व्यवस्थापनासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली.
शहरी भागांमध्ये पुराच्या वाढत्या घटनांचा संदर्भ देत, अमित शाह यांनी सर्व केंद्रीय संस्थांना या शहरांमध्ये पूर नियंत्रणासाठी आवश्यक असलेली, वेळीच कृती करण्याचे आणि मोठ्या शहरांमध्ये पूर व्यवस्थापनासाठी एक व्यापक योजना तयार करण्याचे निर्देश दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली,पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी सज्जतेच्या उपाययोजनांना अमित शाह यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. दरवर्षी केंद्रीय गृहमंत्री पूर तयारीच्या उपाययोजनांचा आढावा घेतात आणि त्यांच्या निर्देशानुसार अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, ज्यात भारतीय हवामान विभाग आणि केंद्रीय जल आयोगाद्वारे आगाऊ पर्जन्यमान आणि पूर अंदाजाचा कालावधी 3 वरून 7 दिवसांपर्यंत वाढवणे आणि उष्णतेच्या लाटेच्या अंदाजासाठी सुधारित मापदंडांचा समावेश आहे.
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2135516)
Read this release in:
Khasi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam