पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 21 APR 2025 4:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 एप्रिल 2025

 

पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोप फ्रान्सिस यांचा  करुणा, नम्रता आणि आध्यात्मिक धैर्याचे प्रतीक म्हणून गौरव केला आहे. 

त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे : 

"परमपूज्य पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने खूप दुःख झाले. या दुःखाच्या  प्रसंगी, जागतिक कॅथोलिक समुदायाप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. पोप फ्रान्सिस, करुणा, नम्रता आणि आध्यात्मिक धैर्याचे प्रतीक म्हणून जगभरातील लक्षावधी लोकांच्या कायम स्मरणात राहतील. बालपणापासूनच त्यांनी प्रभू ख्रिस्तांच्या आदर्शांना साकार करण्यासाठी स्वतःला समर्पित केले. त्यांनी गरीब आणि पददलितांची परिश्रमपूर्वक सेवा केली. दुःखीकष्टी लोकांच्या जीवनात त्यांनी आशेचा किरण जागवला."

त्यांच्यासोबतच्या माझ्या भेटी मला आजही आठवतात आणि सर्वसमावेशक तसेच सर्वांगीण विकासासाठीच्या त्यांच्या वचनबद्धतेने मला खूप प्रेरणा मिळाली. भारतातील लोकांबद्दलचे त्यांचे प्रेम नेहमीच स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो.”

 

* * *

JPS/S.Kakade/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2123165) Visitor Counter : 18